Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युवा संबंधित बाबीमध्ये भारत आणि ट्युनिशिया यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


युवकांशी सबंधित बाबीमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी, भारत आणि ट्युनिशिया यांच्यात नवी दिल्लीत 30.10.2017 मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या विषयी, केंद्रीय मंत्रीमंडळाला आज माहिती देण्यात आली.

भारतीय युवकांमध्ये आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष निर्माण करण्याबरोबरच शांततेला  प्रोत्साहन देण्यासाठी आणि कल्पना, मुल्ये आणि सांस्कृतिक देवाण घेवाण करणे हा यामागचा उद्देश आहे. हा करार पाच वर्षासाठी राहील.

यामध्ये –

  • युवा आदान प्रदान कार्यक्रम आयोजन
  • आंतर राष्ट्रीय परिषदांच्या निमंत्रणाचे आदान प्रदान
  • चित्रपट,संशोधन आणि इतर माहितीचे आदान प्रदान

युवाकॅम्प, युवा महोत्सव, कार्यशाळा आणि युवकांशी संबंधीत इतर कार्यक्रमात सहभाग यांचा समावेश आहे.

BG/NC