Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कायदा अंमलबजावणी प्रशिक्षण विषयी भारत आणि अमेरिका यांच्यातल्या सहकार्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


कायदा अंमलबजावणी प्रशिक्षण विषयी भारताचा पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो आणि अमेरिकेचे संघीय कायदा अंमलबजावणी प्रशिक्षण केंद्र यांच्यातल्या सहकार्य विषयक करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रि मंडळाची मान्यता मिळाली आहे.

यामुळे सुरक्षाविषयक बाबींमध्ये सहकार्य वृद्धीचामार्ग मोकळा झाला आहे.

या करारामुळे प्रशिक्षण,प्रशिक्षण सामग्री,प्रशिक्षकांचा स्तर उंचावण्यासाठी मदत होण्या बरोबरच देशातल्या पोलीस बळाचे कार्य अधिक दर्जेदार होण्यासाठी आणि स्मार्ट पोलीस ही संकल्पना जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे.

कोणत्याही स्वरूपातला दहशतवाद आणि गुन्हेगारीला विरोध तसेच दहशतवादी संघटनांची वाढ रोखणे हे दोन्ही राष्ट्रांचे एकसमान उद्दिष्ट आहे.

पार्श्वभूमी

अमेरिकी राष्ट्रपतींच्या नोव्हेंबर 2010 च्या भारत भेटी दरम्यान उभय राष्ट्रांनी मातृभूमी संरक्षण संवाद यंत्रणा उभारायला संमती दिली होती. ही यंत्रणा भारत- अमेरिका दहशवाद विरोधी उपक्रमाचा एक भाग आहे. यामध्ये सायबर माहिती, क्षमता वृद्धी, तंत्रज्ञान अद्ययावत करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.

BG/NC