पीएम्इंडिया
आफ्रिकी संघटनेचे अध्यक्ष, महामहीम रॉबर्ट मुगाबे, आफ्रिकी संघटना आयोगाच्या अध्यक्ष मॅडम डेलामिनी-झुमा आणि उपस्थित महामहिम,
आफ्रिकेच्या 54 सार्वभौम ध्वजांमुळे जग अधिक समृध्द झाले आहे. चमकदार रंगाच्या या ध्वजांमुळे दिल्ली, आज जगातले विशेष स्थान बनले आहे.
41 देशांचे प्रमुख, इतर मान्यवर नेते, शेकडो वरिष्ठ अधिकारी, आफ्रिकेतले व्यापार, जगतातले धुरिण आणि पत्रकार, आपली सर्वांची उपस्थिती हा आमचा गौरव आहे.
जिथून इतिहासाला प्रारंभ झाला, मानवता समृध्द झाली, आशा वृध्दींगत झाली अशा भूप्रदेशातल्या अभ्यागतांना,
उत्तरेतल्या वाळवंटी प्रदेशातून जिथे मानवी संस्कृती झळाळून उठली.
दक्षिणेकडून महात्मा गांधीपासून ते अल्बर्ट ल्युथिली ते नेल्सन मंडेलांपर्यत अटलांटिकच्या किनाऱ्यापर्यंत जिथे इतिहासाची दु:खद पर्व राहिली आणि आता यशस्वीतेच्या उंबरठयावर आहे, पुनरुत्थित पूर्वेकडच्या किनाऱ्यावरच्या आमच्या शेजाऱ्यांपासून, आफ्रिकेच्या हृदयापासून जिथे निसर्ग उदार आणि संस्कृती समृध्द आहे, आणि द्विपावरच्या राष्ट्रांच्या चमकदार माणकांपर्यंत भारताकडून स्नेहपूर्ण आणि मैत्रीपूर्ण स्वागत. आज ही केवळ भारत आणि आफ्रिका यांची बैठक नाही. आज 1/3 मानवजातीची स्वप्ने एका छत्राखाली आली आहेत. सव्वाशे कोटी भारतीय आणि सव्वाशे कोटी आफ्रिकी यांच्या हृदयाच्या तारा जुळल्या आहेत.
जगातल्या प्राचीन संस्कृतीपैकी आपण एक आहोत. भाषा, धर्म, संस्कृती यांची आपण चैतन्यपूर्ण कलाकृती आहोत. आपला इतिहास युगानेयुगे एकमेकांशी मिळता जुळता आहे.
एकेकाळी भौगोलिकदृष्टया जोडले गेलेले आपण आता हिंदी महासागराद्वारे जोडले गेलो आहोत. वाणिज्य, तसेच शतकांपासून संस्कृतीची जोपासना या सागराच्या लाटांनी केली आहे.
परिस्थितीवश किंवा आपले नशीब आजमावण्यासाठी भारतीयांच्या आणि आफ्रिकी जनतेच्या पिढयांनी एकमेकांच्या देशात प्रवास केला. आपण एकमेकांना समृध्द केले आणि आपले संबंध अधिक दृढ केले.
वसाहतवादाच्या दीर्घ छायेत आपण राहिलो होतो. स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेसाठी आपण लढा दिला. संधी तसेच न्यायासाठी आपण झगडलो.
जगात आपण एकमेकांच्या सुरात सुर मिसळून बोललो आणि प्रगतीसाठी आपल्यात भागीदारीही केली.
शांततेसाठी आपण एकत्र उभे राहिलो. उपासमारी आणि रोगराईविरोधातही आपण एकत्र लढा दिला.
भविष्याकडे पाहताना आपल्याला एकत्र आणणारी काहीतरी मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे आपली युवाशक्ती. 2/3 भारतीय आणि 2/3 आफ्रिकन जनता 35 वर्षाखालील आहे.
भविष्य हे युवकांचे असेल तर या शतकाची उभारणी आणि त्याला आकार आपण देणार आहोत.
महामहीम, आफ्रिकेने या वाटेवर आधीच वाटचाल सुरु केली आहे. आफ्रिकेची प्राचीन कामगिरी आम्हाला माहित आहेच. त्यांची आधुनिक वाटचालही आता जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या खंडाला आता अधिक स्थैर्य लाभले आहे. आपला विकास, शांतता आणि सुरक्षेसाठी आपले उत्तरादायित्व निभावण्यासाठी आफ्रिकी देश आता एकत्र आले आहेत.
आफ्रिकेतील संघर्ष आणि बलिदान यामुळे लोकशाही टिकून राहिली आहे. कट्टरतावादाला आळा घातला जात आहे आणि महिला सक्षमीकरण होत आहे. आफ्रिकेतील विविध देशांच्या संसदेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी 20 टक्के महिला आहेत. त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले अध्यक्ष सरलिफ, यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छा. आफ्रिकेचा आर्थिक विकास गतिमान झाला आहे आणि त्याला आता वैविध्यपूर्ण आधार मिळाला आहे. आफ्रिकेने आपल्या जुन्या उणिवांच्या जागी क्षेत्रीय आर्थिक एकात्मतेसाठी नवे सेतू बांधायला सुरुवात केली आहे.
आर्थिक सुधारणा, पायाभूत विकास आणि साधनसंपत्तीच्या वापराची अनेक उपयुक्त उदाहणे आपण पाहिली.
2013 मध्ये आफ्रिकेत चार लाख नव्या उद्योगांची नोंदणी झाली तर अनेक भागात सुमारे 95 टक्के जनतेपर्यंत मोबाईल पोहोचले आहेत.
शोधांच्या जागतिक मुख्य प्रवाहात आता आफ्रिकाही सहभागी होत आहे. आफ्रिकेतले जीवनमान बदलण्यात एम्. पेसाचे मोबाईल बँकिंग, आरोग्यविषयक मेड आफ्रिका नावाचे आरोग्य सुविधेसाठीचा नवा शोध, कृषी विषयक ॲग्री मॅनेजर आणि किलिमो सालामा हा कृषी विषयक शोध या सर्वात आफ्रिकेतील जीवनमान बदलण्यासाठी मोबाईल आणि तरल तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.
आरोग्यसेवा, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या अनेक ठोस उपाययोजना आपण पाहिल्या, आता आफ्रिकेत, प्राथमिक शाळेतील नोंदणी 90 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.
वन्यजीव संरक्षण आणि इको-टुरिझमबाबत आफ्रिका नवे मापदंड निर्माण करत आहे.
आफ्रिकेतले क्रीडा प्रकार, कलाविश्व आणि संगीताने संपूर्ण जगाला आनंद दिला आहे. उर्वरित विकसनशील देशांप्रमाणे आफ्रिकेलाही विकासविषयक आव्हाने आहेत. जगातल्या इतर देशांप्रमाणेच त्यांना स्वत:च्या सुरक्षा आणि स्थैर्याबाबत चिंता आहेत. विशेषत: दहशतवाद आणि कट्टरतावाद.
मात्र आफ्रिकी नेतृत्व आणि आफ्रिकी जनता या आव्हानांवर मात करेल असा मला विश्वास आहे.
महामहीम,
गेली सहा दशके, स्वातंत्र्यासाठीचा आपला प्रवास एकाचवेळी झाला आहे.
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत आफ्रिका आणि भारत हे दोन आशेचे आणि संधीचे किरण आहेत.
आफ्रिकेसाठी विकासाचा भागीदार होणे भारतासाठी गौरवाचे आहे. धोरणात्मक चिंता आणि आर्थिक लाभांच्या पलिकडे ही भागीदारी आहे. आपल्यात असलेले भावनिक बंध आणि ऐक्य यातून ही भागीदारी साकारली आहे.
दशकापेक्षाही कमी काळात आपला व्यापार दुप्पटीहून जास्त होऊन 70 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. आफ्रिकेतल्या व्यापारविषयक गुंतवणूकीचा, भारत हा प्रमुख स्रोत आहे. सध्या 34 आफ्रिकन देशांना भारतीय बाजारपेठेत डयुटी फ्री प्रवेश आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन धावण्यासाठी आफ्रिकेची ऊर्जा मदत करते. आपल्या उद्योगांना त्यांची साधनसंपत्ती बळ देत आहे आणि आफ्रिकेतल्या समृध्दीमुळे भारतीय उत्पादनांना वाढती बाजारपेठ मिळत आहे.
2008 च्या भारत-आफ्रिकी पहिल्या शिखर परिषदेनंतर भारताने 7.4 अब्ज डॉलर्स इतके सवलतीच्या दरात कर्ज आणि 1.2 अब्ज डॉलर्स अनुदान देण्याप्रती आपली कटिबध्दता व्यक्त केली आहे. यामुळे क्षमता वृध्दींगत करणाऱ्या 100 संस्थांची निर्मिती होत आहे. तसेच पायाभूत सोयींचा विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वच्छ ऊर्जा, पाटबंधारे, कृषी आणि उत्पादन क्षेत्र विकासासाठी आफ्रिकेत याचा वापर होत आहे.
केवळ गेल्या तीन वर्षात 25,000 आफ्रिकी युवकांना भारतात शिक्षण आणि प्रशिक्षण दिले गेले आहे. आपल्यातले हे नवे 25,000 नवे बंध आहेत.
महामहीम,
काही वेळा तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित असणारे सर्वच आम्ही केले, असे नाही. काही प्रसंगात आम्ही अपेक्षित लक्ष पुरवले नाही. काही वचने अपेक्षित वेगाने आम्ही पुरी करु शकलो नाही.
मात्र तुम्ही नेहमीच भारताला स्नेहभाव दिला आमच्या यशात तुम्ही आनंद मानला तसेच आमच्या कामगिरीचा अभिमान बाळगला. जगात तुम्ही आमच्याबाजूने उभे राहिलात. आपल्या मैत्री आणि भागीदारीचे हे बळ आहे. या मार्गावरुन पुढे वाटचाल करताना आमच्या अनुभवाची शिदोरी आणि तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला होईल. जगातला महत्त्वाचा भागीदार असलेल्या आफ्रिकेच्या भरभराटीसाठी आमचे वाढते सहकार्य लाभेल.
कैरोपासून केप टाऊनपर्यंत, मारकेशपासून मोंबासापर्यंत आफ्रिकेला जोडण्यासाठी, पायाभूत सेवा विकसित करण्यासाठी, ऊर्जा आणि सिंचनासाठी, आफ्रिकेतली साधनसंपत्ती विकसित करण्यासाठी, औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान पार्क उभारण्यासाठी आम्ही मदत करु.
महामहीम,
सर्व विकासामध्ये मानवी अस्तित्व ही मूलभूत संपत्ती असल्याचे आग्रही प्रतिपादन, थोर नायजेरियन नोबेल विजेते वोले सोयिंका यांनी केले आहे.
आमचा दृष्टीकोनही याच विश्वासावर आधारित आहे. मानवी श्रमशक्ती संस्था आणि विकसित करणारी भागीदारी ही सर्वात उत्तम भागीदारी असते, अशी भागीदारी कुठल्याही देशाला आपल्या मर्जीने पर्याय शोधण्याचे स्वातंत्र्य देते आणि स्वत:च्या विकासासाठी उत्तरदायित्व स्वीकारण्याची क्षमता देते. युवकांसाठी संधीची दारेही खुली करते.
याचप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक स्तरावर मानवी भांडवलाचा विकास हा आपल्या भागीदारीचा केंद्रबिंदू राहील. संधीची दारे आम्ही आणखी खुली करु, टेली एज्युकेशनचा विस्तार करु, त्याचबरोबर आफ्रिकेतल्या संस्थांची उभारणी सुरुच ठेवू.
विज्ञान लोकांना एकत्र आणते आणि उत्तम भविष्यासाठी प्रोत्साहित करत असते, असे ईजिप्शीयन नोबेल पुरस्कारप्राप्त साहित्यिक नागीब महफूस यांनी म्हटले आहे.
तंत्रज्ञान हा आपल्या भागीदारीचा मजबूत पाया राहील. आफ्रिकेच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्याचा फायदा होईल. जगातील लागवड करण्यायोग्य जमिनीपैकी 60 टक्के जमीन आफ्रिकेत आहे. मात्र जागतिक उत्पादनात केवळ 10 टक्के वाटा आहे. कृषी क्षेत्र आफ्रिका द्विपखंडाला समृध्दी तर देऊ शकतेच शिवाय जागतिक अन्न सुरक्षेला आधार देऊ शकते.
भारतातले उत्तम आरोग्यक्षेत्र आणि वाजवी दरातली औषधे, अनेक रोगांविरुध्द लढण्यासाठी बळ देऊ शकतात, तसेच नवजात बालकांना जगण्याची अधिक चांगली संधी देऊ शकतात. भारतीय आणि आफ्रिकेच्या पारंपारिक ज्ञान आणि औषधांचा खजिना विकसित करण्यासाठीही आपण सहकार्य करु. अंतराळ तंत्रज्ञानही आम्ही उपलबध करुन देऊ विकास, सार्वजनिक सेवा, प्रशासन, साधनसंपत्ती व्यवस्थापन आणि जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करु.
माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कल्पनेतून साकारलेल्या, आणि भारताला 48 आफ्रिकन देशांशी जोडणाऱ्या पॅन आफ्रिका ई नेटवर्कचा आम्ही विस्तार करु. यामुळे पॅन आफ्रिका व्हर्च्युअल विद्यापीठही स्थापन करण्यास मदत होईल.
आफ्रिका आणि उर्वरित जग यांच्यातली डिजीटल क्षेत्रातली दरी कमी होण्यासाठी आम्ही काम करु.
नील अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी सहकार्य करु जे आपल्या भरभराटीचा महत्त्वाचा साथीदार राहतील स्वच्छ ऊर्जेसाठी आपण वाटचाल करत असताना नील अर्थव्यवस्था ही मोठया नीलक्रांतीचा भाग आहे असे मी मानतो.
महामहीम,
सूर्य मावळल्यानंतर भारत आणि आफ्रिकेतली लाखो घरे अंधारात बुडतात. आमच्या जनतेचे आयुष्य आम्हाला उजळवून त्यांचे भविष्य अधिक तेजस्वी करायचे आहे.
मात्र हे अशा पध्दतीने करायचे आहे की किली मांजारोचा बर्फ वितळणार नाही, गंगा नदीला पाणी देणाऱ्या हिमनद्या आटणार नाहीत, आपल्या बेटांना धोका पोहचणार नाही.
जागतिक तापमानवाढीसंदर्भात भारत आणि आफिकेचे योगदान मोठे आहे. हवामानबदलासंदर्भात भारतीय आणि आफ्रिकेपेक्षा कोणीही जास्त जागरुक नाही.
आणि म्हणूनच निसर्गाच्या अनमोल भेटीचे आपण वारसदार आहोत, निसर्गाचा सर्वोच्च आदर करणारी पंरपरा आपल्याला लाभली आहे आणि भूमातेशी आपली आयुष्य सर्वाधिक जोडलेली आहेत.
हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्या मर्यादित साधनसंपत्तीसह आपण प्रयत्न करत आहोत. भारतात, 2022 पर्यंत 175 गिगावॅट अतिरिक्त नूतनीकरण ऊर्जा निर्मिती आणि 2030 पर्यंत कार्बन उर्त्सजनात 33-35 टक्के कपात आमच्या प्रयत्नांपैकी दोन प्रयत्न आहेत.
स्वच्छ ऊर्जा, सार्वजनिक वाहतूक आणि हवामानाशी मिळतीजुळती शेती या क्षेत्रात भारत-आफ्रिका भागीदारी अधिक दृढ केली आहे.
मूठभर लोकांकडे असलेले अतिरिक्त हे अनेकांसाठी ओझे ठरु शकत नाही हे ही तितकेच सत्य आहे. म्हणूनच डिसेंबरमध्ये पॅरिसला जगभरातील राष्ट्र एकत्र येतील, तेव्हा हवामान बदलाबाबतच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुस्थापित तत्त्वांवर आधारित सर्वंकष आणि ठोस निष्कर्षाची आम्ही प्रतिक्षा करु. यासाठी आम्ही प्रयत्नही करु. मात्र स्वच्छ ऊर्जा किफायतशीर दरात उपलब्ध व्हावी, विकसनशील देशांपर्यंत ती पोहोचण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ पुरवावे, हवामान बदलाच्या दुष्परिणामांची झळ कमी होण्यासाठी साधने उपलब्ध करावीत यासाठी जागतिक भागीदारी आम्ही पाहू इच्छितो. मी तुम्हाला सौर समृध्द देशांच्या आघाडीत सामील होण्याचे निमंत्रण देतो, ज्या आघाडीचा प्रारंभ 30 नोव्हेंबरला पॅरिसमध्ये होणाऱ्या COP-21 च्या बैठकीत व्हावा असा प्रस्ताव मी ठेवला आहे.
सौर ऊर्जा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनावा आणि दुर्गम भागातल्या खेडयापाडयांवर, वस्त्यांवर ही सौर ऊर्जा पोहोचवावी हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या विकासाच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देणारी आणि व्यापाराची भरभराट करणारी वैश्विक व्यापार व्यवस्था भारत आणि आफ्रिकेला हवी आहे. या मूलभूत उद्दिष्टांच्या पूर्ततेशिवाय दोहा विकासात्मक कार्यक्रम 2001 समाप्त होता कामा नये याची खातरजमा आपण डिसेंबरमध्ये नैरोबीत होणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तर बैठकीत करायला हवी.
विकसनशील देशातल्या अन्नसुरक्षेसाठी आणि कृषी क्षेत्रात विशेष सुरक्षा यंत्रणेसाठी सार्वजनिक गोदामांबाबत कायमस्वरुपी तोडगाही काढू.
महामहीम,
भविष्यासाठी आपण सूची निश्चित करत आहोत आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा 70 वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत, या पार्श्वभूमीवर हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. जग, राजकीय, आर्थिक, तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक स्थित्यंतरातून मोठया प्रमाणात आणि वेगाने जात आहे. इतिहासात क्वचितच असे घडले असेल. तरीही आपल्या जागतिक संस्थात, आपण मागे सोडलेल्या शतकांचे प्रतिबिंब दिसते, आपण सध्या जिथे आहोत त्याचे नव्हे.
या संस्थांनी आपल्याला उत्तम सेवा दिल्या आहेत, मात्र बदलत्या जगानुसार त्यांनी स्वत:ला बदलले नाही तर त्या कालसुसंगत राहणार नसल्याचा धोका आहे. अनिश्चित भविष्यात त्यांची जागा कोण घेईल हे आपण सांगू शकत नाही.
आपल्या जमान्यातल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी फारसे सक्षम नसलेले विखुरलेले जग कदाचित असेल आणि म्हणूनच जागतिक संस्थातल्या सुधारणा व्हाव्यात अशी भारताची भूमिका आहे.
स्वतंत्र राष्ट्रे आणि जागृत महत्त्वाकांक्षांचे हे जग आहे. संयुक्त राष्ट्रसंघात एक चतुर्थांशपेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या किंवा 1/6 मानवजातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विशाल लोकशाही आफ्रिकेला आवाज न दिल्यास आपल्या संस्था जगाचे प्रतिनिधित्व करु शकणार नाहीत.
आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या, सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांसह इतर सुधारणांसाठी भारत आणि आफ्रिकेने एकमुखाने बोलायला हवे.
महामहिम,
जगाच्या अनेक भागात हिंसाचार आणि अस्थैर्याच्या वादळात उज्ज्वल भविष्याची एक ज्योत तेवत आहे. आफ्रिकेतल्या, रस्त्यांवर, किनाऱ्यांवर, मॉल्समध्ये आणि शाळांमध्ये दहशतवाद जेव्हा आयुष्य हिरावून नेतो, त्यांच्या वेदना आम्हालाही जाणवतात. या धोक्याविरुध्द आपल्याला एकजूट करणारा बंधही आम्हाला दिसतो.
महासागर व्यापारासाठी सुरक्षित राहिले नाहीत तर आपल्या सर्वांना त्याचा फटका सोसावा लागेल. राष्ट्राराष्ट्रात संघर्ष झाल्यास त्याची झळ सर्वानाच बसेल.
सायबर नेटवर्क संधी आणण्याबरोबरच मोठा धोकाही आणते हे आपण जाणतो.
त्यामुळे जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा केवळ अंतर आपल्याला एकमेकांपासून वेगळे ठेवत नाही. म्हणूनच सागरी सुरक्षा आणि हायड्रोग्राफी क्षेत्रात तसेच दहशतवादाला आळा घालण्यासाठी आपले सहकार्य आम्ही अधिक दृढ करु इच्छितो. तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादावर संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वंकष कराराचीही आवश्यकता आहे. आम्ही आफ्रिकन महासंघात कायम शांतता नांदावी यासाठीच्या प्रयत्नातही सहकार्य देऊ, आफ्रिकी शांतता रक्षकांना आम्ही भारतात आणि आफ्रिकेत प्रशिक्षण देऊ. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतता मोहिमांशी संबंधित निर्णयात आमचा आवाज बुलंद असायला हवा.
महामहिम,
आपल्या भरभराटीसाठी आपली आयुष्य जोडण्यापासून जागतिक हितासाठी आपल्या जनतेच्या सुरक्षिततेपर्यंत आपल्या भागीदारीची व्याप्ती पसरली आहे.
ही भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी येत्या पाच वर्षात भारत 10 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा सवलतवजा पतपुरवठा करणार आहे. हा पतपुरवठा सध्याच्या पतकार्यक्रमा व्यतिरिक्त राहील.
600 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची अनुदान सहाय्यताही भारत देईल. 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा भारत-आफ्रिका विकास निधी आणि 10 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या भारत-आफ्रिका आरोग्य निधीचा यात समावेश आहे.
येत्या पाच वर्षात भारतात दिल्या जाणाऱ्या 50,000 शिष्यवृत्तीचाही यात समावेश आहे. पॅन आफ्रिका ई नेटवर्क तसेच आफ्रिकेत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि शिक्षण संस्थांच्या विस्ताराला याचे सहाय्य होईल.
महामहीम,
जिथे सर्व मानवजातीला जगण्याची संधी मिळेल जिथे समानता, प्रतिष्ठा तसेच शांतता आणि निसर्गाशी समतोल राखणारे जीवन असेल असे शतक घडवायचे असेल तर भारत आणि आफ्रिकेला एकत्र उभे राहायला हवे.
आपण एकत्र काम करु.
आपल्या समान संघर्षाच्या स्मृतीपासून आपल्या आशाही एकत्र आहेत.
आपल्या परंपरा समृध्द आहेत आणि पृथ्वीपती कटिबध्दता एक आहे.
जनतेप्रती कटिबध्दता एक आहे. भविष्याप्रती विश्वास एक आहे.
आफ्रिकी म्हणीप्रमाणे एक छोटे घर शेकडो मित्रांना एकत्र आणते.
सन्त: स्वयं परहिे निहिताभियोगा म्हणजेच दुसऱ्याच्या भल्यासाठी महान लोक नेहमीच पुढाकार घेतात असा भारताचा पारंपरिक विश्वास आहे. अशाप्रकारे जीवन जगा की दुसऱ्याचे स्वातंत्र्य आणि आदर वृध्दींगत होईल हे नेल्सन मंडेला यांचे आवाहन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
आज, आपण एकत्र चालण्यासाठी, बरोबरीने पावले टाकण्यासाठी, सलोख्याने एकसुरात राहण्यासाठी प्रतिज्ञाबध्द होऊ या.
हा कोणता नवीन प्रवास नाही, ही नवी सुरुवातही नाही. मात्र प्राचीन नातेसंबंधाच्या उज्वल भविष्यासाठीचे नवे आश्वासन आहे.
महामहीम, आपली उपस्थिती ही आपल्या कटिबध्दतेचे आणि दृढतेचा ठोस पुरावा आहे.
N.Chitale/S.Tupe
Fabric of this world is richer because of the 54 sovereign flags of Africa: PM @narendramodi begins his speech https://t.co/Iy8hu3Nre5 #IAFS
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
We are deeply, deeply honoured by your presence today: PM @narendramodi to African leaders @indiafrica2015 #IAFS https://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
It is not just a meeting of India & Africa. Today, the dreams of one-third of humanity have come together under one roof: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
The heart beat of 1.25 billion Indians & 1.25 billion Africans are in rhythm: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
2/3rd of India & Africa is under the age of 35. And, if the future belongs to the youth, then this century is ours to shape & build: PM
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
Africa’s economic growth has gathered momentum and has a more diversified base: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
African initiatives are replacing old fault lines with new bridges of regional economic integration: PM https://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
Africa’s sports, art and music delight the entire world: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3Nre5 #IAFS @indiafrica2015
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
Africa and India are two bright spots of hope and opportunities in the global economy: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3Nre5 #IAFS
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
Technology will be a strong foundation of our partnership: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3Nre5 #IAFS @indiafrica2015
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
We will also collaborate to develop Indian and African treasures of traditional knowledge and medicines: PM @narendramodi @indiafrica2015
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
We will work to reduce digital divide within Africa and between Africa and rest of the world: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
We will also deepen India-Africa partnership on clean energy, sustainable habitats, public transport & climate resilient agriculture: PM
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
We wish to deepen our cooperation in maritime security and hydrography, and countering terrorism and extremism: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
We pledge to walk together, with our steps in rhythm and our voices in harmony: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 29, 2015
Today's proceedings at @indiafrica2015 got off to a great start. Dreams of 1/3rd of humanity gathered under 1 roof pic.twitter.com/Ojd6w0iTnl
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2015
We will walk together, our steps in rhythm & voices in harmony. We see a great future for this ancient relationship. https://t.co/2CDOWMQ6kz
— NarendraModi(@narendramodi) October 29, 2015