Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष  शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांनी दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि आरोग्य या क्षेत्रांसह भारत-संयुक्त अरब अमिराती व्यापक धोरणात्मक  भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या नव्या उपाययोजनांवर चर्चा केली.

संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या यशस्वी ब्रिक्स अध्यक्षपदाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी ब्रिक्स शिखर परिषदेतील युवराज शेख खालिद यांच्या सहभागाचे आणि भारताच्या अध्यक्षतेखाली ठोस परिणाम साधण्यात संयुक्त अरब अमिरातीच्या सहकार्याचे व भागीदारीचे कौतुक केले.

दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील घडामोडींवर विचारविनिमय केला. प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये निरंतर सहकार्य आणि समन्वयासाठी त्यांनी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***

निलिमा चितळे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai