Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पारंपरिक औषध पद्धती मध्ये भारत आणि इराण यांच्यातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पारंपरिक औषध  पद्धती मध्ये भारत आणि इराण यांच्यातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

 

लाभ-

या सामंजस्य करारामुळे उभय देशात पारंपरिक औषध पद्धती मधले द्विपक्षीय सहकार्य वृद्धिगत होणार आहे. दोन्ही देशातली सांस्कृतिक परंपरा लक्षात घेता हा सामंजस्य करार अतिशय महत्वाचा  आहे.  

पूर्वपीठीका-

भारताला  वनौषधीसह विकसित पारंपरिक औषध पद्धतीची समृद्धता लाभली असून सध्याच्या जागतिक परिस्थितीत या पद्धतीला प्रचंड वाव आहे.

भारत आणि इराण यांच्यात संस्कृती,भाषा,परंपरा आणि वनौषधीचा उपयोग करणे यामध्ये साधर्म्य आहे. दोन्ही देशात प्रचंड जैव विविधता असून पारंपरिक औषध पद्धतीमध्ये उपयोगात येणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पतींचे हे दोन्ही देश म्हणजे माहेरघर आहेत. इराणने, भारताला पारंपरिक औषध पद्धतीमध्ये अग्रगण्य म्हणून मान दिला आहे. भारतात यासंदर्भात व्यापक आणि मजबूत पायाभूत संरचना आणि उत्पादन निर्मिती आहे.  

आयुर्वेद,योग,निसर्गोपचार,युनानी,सिध्द,होमिओपथी  यासारख्या पारंपारिक औषध पद्धतीचा जगभरात प्रसार करण्याची जबाबदारी आयुष मंत्रालयावर सोपवण्यात आली आहे.त्या अंतर्गत आयुष मंत्रालयाने चीन,मलेशिया,त्रिनिनाद आणि टोबेगो, हंगेरी,बांग्लादेश, नेपाळ, मंगोलिया या देशांबरोबर सामंजस्य करार करून या दृष्टीकोनातून पाऊले उचलली आहेत. श्रीलंकेसमवेत सामंजस्य करार करण्याचे प्रस्तावित आहे.  BG/NS