Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीशैलम येथे राष्ट्रीय जन जागृती धर्म संमेलनाला पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले संबोधित

श्रीशैलम येथे राष्ट्रीय जन जागृती धर्म संमेलनाला पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  केले संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीशैलम येथे राष्ट्रीय जन जागृती धर्म संमेलनाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले.

उगादी निमित्त सर्वांना शुभेच्छा देत पंतप्रधान म्हणाले की, उगादी हा नवीन सुरुवातीचा आणि नवीन आशांचा उत्सव आहे.

सरकार निश्चित उद्दिष्टे आणि मुदतीसह विविध योजनांवर काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

या संदर्भात त्यांनी जन-धन खाती उघडणे, गरीबांना विमा संरक्षण, उज्वला स्वयंपाकाचा गॅस जोडणी, मुद्रा योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना वगैरेंच्या प्रगतीचा उल्लेख केला.

पायाभूत विकासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढल्याचे ते म्हणाले. त्यांनी आयुष्मान योजना आणि राष्ट्रीय पोषण अभियानाचाही उल्लेख केला . स्वच्छ भारत अभियानामुळे देशभरात स्वच्छतेत लक्षणीय वाढ झाल्याचे ते म्हणाले.

देशाने शक्य तितक्या लवकर आपला कमकुवतपणा झटकून टाकावा असे जनतेला वाटत असल्याचे, आणि राष्ट्र निर्मितीसाठी सरकार कठोर मेहनत घेत आहे आणि सर्वांच्या पाठिंब्याने या प्रयत्नांना गती मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar