पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यापारविषयक उपाययोजनांवर दोन्ही देशांच्या हितसंबंधात सहकार्य वाढवण्यासाठी एक विशेषज्ञ समूह स्थापन करण्याबाबत भारत आणि इराण यांच्यातील सामंजस्य कराराला पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली. 17 फेब्रुवारी, 2018 रोजी इराणच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
हा करारामुळे उभय देशातील माहितीची देवान घेवाण, क्षमता वृद्धी इत्यादी सारख्या व्यापार विषयक उपाययोजनांवर सहकार्याला प्रोत्साहन मिळेल.
NS/SM/PK