Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसीमध्ये बांधकाम सुरु असलेला उड्डाणपूल कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


वाराणसीमध्ये बांधकाम सुरु असलेला उड्डाणपूल कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले,”वाराणसीमध्ये बांधकाम सुरु असलेला उड्डाणपूल कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख झाले आहे. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो. अधिकाऱ्यांशी बोललो असून आपत्तीग्रस्तांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यास सांगितले आहे.

वाराणसीमध्ये बांधकाम सुरु असलेला उड्डाणपूल कोसळल्यामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेश सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि पीडितांना मदत करत आहे.”

N.Sapre/S.Kane/D.Rane