Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 28 जून 2018 ला संत कबीरनगरला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशातल्या संत कबीर नगर जिल्ह्यातल्या मगहर येथे भेट देणार आहेत.

थोर संत आणि कवी कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त संत कबीर यांच्या मझारवर ते चादरही चढवतील.

संत कबीर गुंफेलाही पंतप्रधान भेट देतील तसेच संत कबीर अकादमीच्या पायाभरणी समारंभानिमित्त कोनशीलेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. संत कबीर यांची शिकवण आणि विचार या कोनशीलेवर नमूद करण्यात आले आहेत.

त्यानंतर ते मगहर इथे सभेत जनतेला संबोधित करतील. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar