Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि सिंगापूर दरम्यान नियोजन क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि सिंगापूर दरम्यान शहर नियोजन आणि विकास क्षेत्रातसह्कार्यावरील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली३१ मे २०१८ रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

शहर विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रात आणि अन्य क्षेत्रात सिंगापूरमधील संस्थांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी  महानगर पालिकांसहकेंद्र आणि राज्य सरकारच्या संस्थांना मदत पुरवणे आणि याद्वारे शहर पुनरुत्थान अभियानाला मदत करणे हा या कराराचा उद्देश आहे.यामुळेनीती आयोगात क्षमता निर्मिती होईल आणि पुरावा आधारित धोरण आखणीमूल्यमापन आदी बाबींमध्ये अधिकाऱ्यांचे कौशल्य वाढेल आणिनीती आयोगाला अधिक प्रभावीपणे निर्णय घेणे शक्य होईल.

या करारांतर्गत शहर नियोजनपाणी घनकचरा व्यवस्थापनप्रभावी वाहतूक प्रणाली आणि सार्वजनिक अर्थसहाय्य (सार्वजनिकखासगी भागीदारीया क्षेत्रात क्षमता निर्मिती कार्यक्रम हाती घेतले जातील.

मुख्य प्रभाव:

या करारामुळे उत्तम पद्धतीच्या ज्ञानाचा प्रसार होईलक्षमता वाढेल आणि शहर नियोजनपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन वाहतूकप्रणाली आणि सार्वजनिक वित्त पुरवठा या क्षेत्रात राज्य आणि केंद्र स्तरावरील विविध सरकारी संस्थांना मदत मिळेल.

लाभार्थी:

केंद्रराज्य सरकार आणि शहरी स्थानिक संस्थांमधील अधिकाऱ्यांच्या ज्ञानाची व्याप्ती वाढल्याने त्यांना थेट लाभ होईल आणि पर्यायानेशहरी नागरी सुविधांमध्ये सुधारणा होईल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar