Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा ओदिशा दौरा: तालचेर खत प्रकल्पाचे पुनर्निर्माण आणि झारसुगुडा विमानतळाचे उद्‌घाटन

पंतप्रधानांचा ओदिशा दौरा: तालचेर खत प्रकल्पाचे पुनर्निर्माण आणि झारसुगुडा विमानतळाचे उद्‌घाटन

पंतप्रधानांचा ओदिशा दौरा: तालचेर खत प्रकल्पाचे पुनर्निर्माण आणि झारसुगुडा विमानतळाचे उद्‌घाटन

पंतप्रधानांचा ओदिशा दौरा: तालचेर खत प्रकल्पाचे पुनर्निर्माण आणि झारसुगुडा विमानतळाचे उद्‌घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा राज्याचा दौरा केला. तालचेर येथे त्यांच्या हस्ते तालचेर खत निर्मिती प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले.

या खत प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होणे कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. ज्या आशाआकांक्षा अनेक वर्षांपूर्वी पूर्ण व्हायला हव्या होत्या त्या आमचे सरकार आता पूर्ण करत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारताला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे सरकारचे ध्येय आहे आणि खत निर्मितीसारखे प्रकल्प देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी असतात असे पंतप्रधानांनी सांगितले. या नव्या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

झारसुगुडा येथे पंतप्रधानांच्या हस्ते झारसुगुडा विमानतळाचे विमानतळाचे उद्‌घाटन झाले आणि झारसुगुडाहून रायपूरसाठी रवाना झालेल्या पहिल्या विमानाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर गर्जनबहाल कोळसा खाण तसेच झारसुगुडा-बारापल्ली-सरदेगा रेल्वे मार्गाचे लेाकार्पणही त्यांच्या हस्ते झाले. दुलंगा कोळसा खाणीत कोळसा उत्पादन आणि वाहतूक व्यवस्थेची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात आली.

झारसुगुडा विमानतळाचे उद्‌घाटन आणि इतर विकास प्रकल्पांचा शुभारंभ करताना आपल्याला विशेष आनंद होत आहे, असे ते म्हणाले. या प्रकल्पांमुळे ओदिशाच्या जनतेला लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील नागरी हवाई क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत असून त्याचे थेट लाभ सव्वाशे कोटी भारतीयांना मिळणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

झारसुगुडा येथील विमानतळामुळे ओडिशातील जनतेच्या गरजा पूर्ण होतील. सर्वांगिण विकासासाठी दळणवळण व्यवस्था मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले. देशभरातच दळणवळण व्यवस्था उत्तम आणि आधुनिक करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor