Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांना मरणोत्तर पुन्हा “बार” बहाल करण्याचे प्रमाणपत्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्यामजी कृष्ण वर्मा यांना पुन्हा मरणोत्तर “बार” पुन्हा बहाल करण्याचे प्रमाणपत्र गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना सुपूर्द केले. लंडनच्या ऑनरेबल सोसायटी ऑफ इनर टेंपलद्वारा ही पुनर्बहाली करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या महिन्यातील लंडन भेटीच्या वेळी, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांच्या उपस्थितीत हे प्रमाणपत्र पंतप्रधान मोदी यांना देण्यात आले होते.

गुजरातमधल्या भूज येथे आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्यामजी कृष्ण वर्मा हे असे विद्वान व्यक्ती होते, ज्यांना काशीमध्ये मोठी मान्यता मिळाली होती. त्‍यांनी लंडनमध्ये सक्रीयरित्या भारतीय स्वातंत्र्य लढयाचा वसा उचलला होता असे पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना सांगितले.

पोलिस महासंचालकांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आपण कच्छला भेट देत आहोत, असे पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना सांगितले. याआधी ही परिषद नेहमीच दिल्लीत घेतली जात होती, आणि ही परिषद नवी दिल्लीबाहेर घेण्यासाठी आपण गेल्यावर्षी पुढाकार घेतला असेही ते म्हणाले. कच्छच्या रणातील “रणोत्सव महोत्सवा”बद्दल आनंद व्यक्त करुन हा महोत्सव पर्यटकात लोकप्रिय होत असून, या महोत्सवाने आता जागतिक पर्यटन नकाशात स्थान मिळवल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai