Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कच्छ येथे आयोजित पोलिस महासंचालकांच्या परिषदेतील विविध सत्रांत पंतप्रधान सहभागी

कच्छ येथे आयोजित पोलिस महासंचालकांच्या परिषदेतील विविध सत्रांत पंतप्रधान सहभागी

कच्छ येथे आयोजित पोलिस महासंचालकांच्या परिषदेतील विविध सत्रांत पंतप्रधान सहभागी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कच्छ येथे आयोजित पोलिस महासंचालकांच्या तीन दिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, संकल्पनांवर आधारित सत्रांना हजेरी लावली.

आज पहाटे पंतप्रधान, इतर प्रतिनिधींसह योगासनांच्या सत्राला उपस्थित राहिले. व्हाइट रण येथील सुर्योदयाचाही त्यांनी आस्वाद घेतला.

पोलिस यंत्रणेच्या विविध पैलुंवर विषयाधारित सादरीकरणे आणि त्यावरील विचारमंथनात पंतप्रधान सहभागी झाले. दहशतवाद, सायबर सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान, स्त्रियांचे संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासह संरक्षणाशी संबंधित बाबींवर आधारित सत्रांमध्येही पंतप्रधानांनी सहभाग घेतला तसेच या विषयांवर आधारित सादरीकरणेही पाहिली. आज एकूण १३ तास चाललेल्या सत्रांमध्ये विविध सादरीकरणे, अल्प विराम तसेच भोजनादरम्यान परस्पर संपर्कासाठीचे कार्यक्रम निर्धारित करण्यात आले होते. गृहमंत्री राजनाथ सिंग, गृह राज्यमंत्री किरण रीजीजू आणि हरिभाई पार्थीभाई चौधरी सुध्दा या सत्रांना उपस्थित होते.

M.Pange/S.Tupe/M.Desai