Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसद भवन परिसरात रेट्रोफिट इलेक्ट्रीक बसच्या प्रात्यक्षिक समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती

संसद भवन परिसरात पार पडलेल्या रेट्रोफिट इलेक्ट्रिक बस प्रात्यक्षिक समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित होते. या डिझेल बसचे रुपांतर बॅटरीचलित विद्युत बसमध्ये करण्यात आले आहे. संसद सदस्यांना स्वच्छ प्रदूषण विरहीत वाहतूक पुरवण्याच्या उद्देशाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा उपक्रम हाती घेतला.

पंतप्रधानांनी या बसची पाहणी केली आणि नंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे या बसच्या चाव्या सुपूर्द केल्या.

याप्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, पर्यावरणाबाबत संपूर्ण जगभरात बऱ्याच कालावधीपासून चर्चा होत आहे परंतु मागील काही वर्षांपासून सामान्यांच्या आयुष्यावर याचे विपरित परिणाम दिसून येतात.

पंतप्रधानांनी यावेळी पॅरिसमधील सीओपी 21 परिषदेचा पुनरुच्चार करुन यातील दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांची आठवण करुन दिली. “नाविन्य अभियान” हा एक उपक्रम जो हरित तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अमेरिका, फ्रान्स आणि भारत एकत्रितपणे राबवत असून याकरिता बिल गेट्‌स संस्थादेखील मदत करत आहे. दुसरा उपक्रम म्हणजे ज्या देशांमध्ये मुबलक सूर्यप्रकाश आहे त्या देशांची एक आंतरराष्ट्रीय ऊर्जा संघटना स्थापन करणे. या संघटनेचे मुख्यालय हे दिल्ली येथे असणार आहे.

ही बस सुरु केल्याबद्दल पंतप्रधानांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले. भारतामध्ये अशा प्रकारच्या स्वस्त आणि कार्यक्षम विद्युत बॅटरी निर्माण करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी उद्योजकांना केले. यामुळे स्वच्छ सार्वजनिक वाहतूकीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

याप्रसंगी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू , प्रकाश जावडेकर आणि मोठया प्रमाणात संसद सदस्य उपस्थित होते.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai