Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी अल्स्टॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशी साधला संवाद;युवा शक्तीला बरोबर घेवून जागतिक सहकार्याच्या संधींवर भारताचा भर

पंतप्रधानांनी अल्स्टॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशी साधला संवाद;युवा शक्तीला बरोबर घेवून जागतिक सहकार्याच्या संधींवर भारताचा भर


नवी दिल्ली, 18 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्स्टॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशी फलदायी संवाद साधला.

अल्स्टॉमची भारतात आधीपासूनच मजबूत उपस्थिती असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताच्या विकासगाथेमध्‍ये  कंपनीचा विश्वास तसेच ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.

आगामी काळात उभयबाजूंनी  संधी आणखी व्यापक आणि अधिक चांगल्या होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

आपल्या युवा शक्तीला बरोबर घेवून  सहकार्य केले जावे, यासाठी भारत जगाला आमंत्रित करत असल्याचे,  पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले :

“अल्स्टॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याबरोबर फलदायी संवाद साधला. अल्स्टॉमची भारतात आधीपासूनच मजबूत उपस्थिती आहे. भारताच्या विकासगाथेवरील त्यांचा विश्वास आणि ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या दिशेने त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. आगामी काळात या संधी आणखी व्यापक होणार आहेत.

आपल्या युवा शक्तीला बरोबर घेवून सहकार्य केले जावे, यासाठी भारत जगाला आमंत्रित करीत आहे.”

सुवर्णा बेडेकर/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai