Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय युवा महोत्सव 2016 साठी पंतप्रधानांनी विचार मागवले


येत्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2016 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा नागरिकांकडून नवकल्पना मागविल्या आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी 2016 पासून छत्तीसगड येथे हा महोत्सव सुरु होईल.

युवा मित्रहो, 2016 राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी तुमच्या काय कल्पना आहेत ? तुमच्या कल्पना http://nm4.in/dnldapp या मोबाईल ॲपचा वापर करुन माझ्यापर्यंत पोहोचवा.

स्वामी विवेकानंद यांच्‍या जयंतीदिनी म्हणजे 12 जानेवारीपासून सुरु होणारा हा महोत्सव छत्तीसगडसारख्या सुंदर राज्यात आयोजित केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Chitale/M.Desai