Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बांधकामाच्या वेळी निर्माण होणाऱ्या कचरा समस्येच्या मुकाबल्यासाठी नॉर्वेमधली संस्था भारताला मदत करणार


बांधकाम तसेच इमारत पडझडी दरम्यान निर्माण झालेल्या कचऱ्याच्या पुनर्वापराच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी तसेच या क्षेत्रात मनुष्यबळ विकास क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खाते आणि नॉर्वेच्या एसआयएनटीइएफ यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्‍यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मोहोर उठवली.

भारतातल्या बांधकाम व्यवसायात प्रतिवर्षी 10-12 दशलक्ष टन कचऱ्याची निर्मिती होते. यापैकी विटा, धातू यासारख्या वस्तूंचा पुन्हा वापर केला जातो. मात्र कॉक्रीट, दगड यासारख्या मोठया प्रमाणातल्या कचऱ्याचा मात्र भारतात सध्या पुन्हा वापर केला जात नाही.

N.Chitale/M.Desai