Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंतराळ तंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण वापरासाठीच्या भारत आणि तझाकिस्तान यांच्यातल्या सहकार्याविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


विकासासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण वापराबाबत सहकार्यासाठी भारत आणि तझाकिस्तान यांच्यातल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. दुशांबे येथे 8 ऑक्टोबरला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

तपशील

उपग्रह दळणवळण आणि उपग्रह आधरित नेव्हीगेशन, अंतराळ विज्ञान, अंतराळ यानाचा उपयोग, अंतराळ यंत्रणा, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या क्षेत्रातल्या संभाव्य सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.

या सामंजस्य कराराअंतर्गत, संयुक्त कृती गट स्थापन करण्यात येणार असून सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीचा कृती आराखडा आणि कालमर्यादा यासह इतर बाबींवर हा कृती गट काम करेल.

प्रभाव-

यामुळे उपग्रह नेव्हीगेशन, अंतराळ विज्ञान, बाह्य अंतराळ शोध क्षेत्रात नव्या शोधांना चालना मिळणार आहे.

लाभ-

मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग या क्षेत्रात संयुक्त कृती विकासाला या सामंजस्य करारामुळे चालना मिळेल.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor