पीएम्इंडिया
आरोग्य देखभाल आणि आरोग्य क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत आणि जपान यांच्यातल्या सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. 29 ऑक्टोबरला या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
विशिष्ट प्रकल्पांना प्रोत्साहन
1) औषध, ट्रॉमा केअर क्षेत्रात मानव संसाधन विकास
2) चिकित्सेसाठी अत्याधुनिक परीक्षण प्रयोगशाळा उभारणी
3) देखभाल करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना जपानी भाषा शिक्षण केंद्र उभारणे
4) एयूएमएस सारख्या क्षेत्रात दोन्ही देशातल्या देखभाल केंद्रात सहकार्य स्थापित करणे
5) वृद्धांच्या देखभालीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
पायाभूत सुविधांचा विकास
· मध्यवर्ती आरोग्य देखभाल व्यवस्थान वितरण केंद्र उभारणे
· स्वच्छ आणि किफायतीदरातल्या शौचालयांची उपलब्धता वाढवून स्वच्छता वाढविणे
· भारतात, भारत-जपान इनोव्हेशन हब
· भारतात उच्चस्तरीय बीएसएल 3 प्रयोगशाळा सुविधांची निर्मिती
मानव विकास
1) आयुर्वेदासारख्या आरोग्य विषयक स्व व्यवस्थापन प्रकल्पांच्या प्रोत्साहनासाठी आणि संशोधनासाठी मानवी संसाधन विकसित करणे
2) भारत-जपान सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य देखभाल फोरम स्थापन करणे
या कराराची अंमलबजावणी आणि सहकार्याबाबतच्या तपशीलासाठी उच्चस्तरीय सल्लात्मक संयुक्त समिती स्थापन केली जाईल.
B.Gokhale/N.Chitale /P.Kor