Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 5 जानेवारी 2019 रोजी झारखंड आणि ओदिशाला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी 2019 रोजी झारखंड आणि ओदिशाला भेट देणार आहेत.

झारखंड येथे पंतप्रधानांनी उत्तर कोयल (मंडल धरण) आणि कनहर स्टोन पाईपलाईन सिंचन प्रणालीच्या पुनरुज्जीवनासाठी एका पट्टिकेचे अनावरण करुन पायाभरणी केली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 25 हजार लाभार्थ्यांच्या सामूहिक ई-गृहप्रवेशाचा शुभारंभ ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार आहेत. तसेच ते एका सभेलाही संबोधित करतील.

त्यानंतर पंतप्रधान ओदिशाला रवाना होतील. बारीपाडा येथे आयओसीएलची एलपीजी पाईपलाईन परियोजनेचा बालासोर-हल्दिया-दुर्गापूर विभाग आणि बालासोर मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क राष्ट्राला समर्पित करतील.

हरीपूरगड या प्राचीन किल्ल्यात रसिका रे मंदिराच्या विकास आणि संवर्धनाशी संबंधित कार्याच्या शुभारंभानिमित्त एका पट्टिकेचे अनावरण करतील. विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या चौपदरीकरणासाठी पायाभरणी करतील आणि सहा पारपत्र सेवा केंद्रांचे उद्‌घाटन करतील. टाटानगर ते बदाम पहाडपर्यंत धावणाऱ्या दुसऱ्या पॅसेंजर रेल्वेगाडीलाही ते हिरवा झेंडा दाखवतील.

बारीपाडा येथे एका सभेलाही ते संबोधित करतील.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar