Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सीपीएसई,पीएसयु,अन्य सरकारी संघटनांची संपत्ती आणि शत्रू स्थावर मालमत्तेची  वैधानिक मुल्यांकन प्रक्रिया आणि व्यवस्था तयार करण्यासाठी मंत्री मंडळाची मान्यता


 
केंद्रीय मंत्री मंडळाने, धोरणात्मक निर्गुंतवणूकी अंतर्गत, केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांची कमी महत्वाची  संपत्ती आणि शत्रू संपत्ती अधिनियम 1968 च्या कलम
 
 ‘8 अ’ च्या चौथ्या उपकलमानुसार,गृह मंत्रालयाला,शत्रू संपत्ती संरक्षण अंतर्गत, शत्रू स्थावर मालमत्तेच्या  वैधानिक मुल्यांकनासाठी   संस्थागत व्यवस्था तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे. 
 
सार्वजनिक उपक्रम, सीपीएसई, इतर सरकारी संघटना, तोट्यात चालणारे आणि आजारी केंद्रीय सार्वजनिक उपक्रम यासाठीही ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
***
B.Gokhale/N.Chitale