Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विश्व सांस्कृतिक महोत्सवातील पंतप्रधानांचे भाषण

विश्व सांस्कृतिक महोत्सवातील पंतप्रधानांचे भाषण

विश्व सांस्कृतिक महोत्सवातील पंतप्रधानांचे भाषण


परमपूज्य श्री श्री रविशंकर जी.. सर्व उपस्थित मान्यवर मी भारताच्या भूमीवर आपल्या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करतो.

भारत एवढया विविधतेने भरल आहे, जगाला देण्यासाठी भारताकडे खूप काही आहे. जग केवळ आर्थिक हितांमुळे जोडले गेलेय असे नाही, जग मानवी मूल्यांमुळेही जोडले जाऊ शकते आणि जोडले गेलेही पाहिजे.

भारताजवळ सांस्कृतिक वारसा आहे, असे सांस्कृतिक अधिष्ठान आहे, ज्याचा शोध सर्व जग घेत आहे. आम्ही जगाच्या या आवश्यकता काही ना काही प्रमाणात, काही ना काही रुपात पूर्ण करु शकतो. पण हे तेव्हाच साध्य होईल, जेव्हा आम्हाला आमच्या महान वारश्याबद्दल अभिमान वाटेल.

जर आपण आपल्यालाच दोष देत राहिलो, आपल्याच प्रत्येक गोष्टीवर टीका करत राहिलो, तर जग आपल्याकडे का पाहिलं ?

35 वर्षांच्या छोटयाश्या कार्यकाळात जगातल्या 150 हून अधिक देशांमध्ये या मिशनने जोमाने प्रसार करत, त्या देशांना आपलेसे करुन टाकले आहे. “आर्ट ऑफ लिव्हिंग”च्या माध्यमातून जगात भारताची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्याबद्दल मी श्री श्री रविशंकर यांचे अभिनंदन करतो.

मी काही दिवसांपूर्वी मंगोलियाला गेलो होतो. मंगोलियातल्या एका स्टेडिअममध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व बंधुंनी माझ्या स्वागतासाठी समारंभ आयोजित केला होता, ते पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्यांच्यामध्ये भारतीय खूप कमी होते. पूर्ण स्टेडिअम मंगोलियन नागरिकांनी भरलेले होते आणि त्यांनी हातात भारताचा तिरंगा घेऊन ज्याप्रकारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले, ते खरोखरच खूप प्रेरणादायी होते. जिथे राज्यशक्ती आणि राज्यसत्ता पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणीही आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मृदू शक्ती एक महत्वपूर्ण भूमिका निभावते.

आज आपल्याला अशा कुंभमेळयाचे दर्शन होत आहे, हा कलेचा कुंभमेळा आहे. भारतात अशी समृध्दी हाती की येथे कला पूर्णत: विकसित झाली होती. ही अशी भूमी आहे, जिथे प्रत्येक प्रहराचे संगीत वेगळे आहे. सकाळचे संगीत वेगळे आहे, तर संध्याकाळचे आणखी वेगळे आहे. बाजारात संगीताच्या विश्वाला शोधायला गेलो तर देहाला डोलवणाऱ्या संगीताने बाजार भरलेला आहे, पण मनाला डोलवणारे संगीत तर फक्त हिंदुस्थानातच भरुन राहिले आहे. आणि आता जगाला मनाला डोलवायचे आहे आणि या संगीताचीच साधना आहे, जी जगाच्या मनाला डोलवू शकेल.

जेव्हा कलेच्या माध्यमातून कोणत्याही देशाकडे पाहिले जाते, तेव्हा त्या देशाच्या अंतर्गत ताकदीची ओळख पटते. आज भारताच्या कलेची शक्ती आणि अनेक पिढयांपासून कला साधना करणारे लोक जगाला एक अमूल्य भेट देत आहेत. या समारंभाच्या वेळी निसर्गानेही परीक्षा पाहिली, पण हेच तर “आर्ट ऑफ लिव्हिंग” आहे. सोय आणि सहजता यांच्यामध्ये जगायचे असेल, तर जगता येईल, पण त्यात कला नसते. जेव्हा आपण आपल्यासमोर ध्येय ठेवून मार्गक्रमण करतो, तेव्हा “आर्ट ऑफ लिव्हिंग”ची गरज असते. जेव्हा संकटांचा सामना करतो, तेव्हांही आर्ट ऑफ लिव्हिंग हवे असते. जेव्हा स्वत:साठी नाही, तर इतरांसाठी जगत असतो, तेव्हांही आर्ट ऑफ लिव्हिंगच आवश्यक असते. जेव्हा आपण “स्वत:”ला सोडून देत “आपण” याकडे वाटचाल करतो, तेव्हांही आर्ट ऑफ लिव्हिंग हवेच असते.

आपण जो “अहम्‌ ब्रहमास्मि” पासून प्रारंभ करतो आणि “वसुधैव कुटुंबम्‌” कडे प्रवास करतो, तेच हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आम्ही असे आहोत ज्यांनी उपनिषदांपासून उपग्रहांपर्यंत प्रवास केला आहे आणि हीच जीवन जगण्याची कला आपल्या ऋषींनी, मुनींनी, ज्ञानी जन, तपस्वी यांनी आम्हाला वारसा म्हणून दिली आहे. संकंटांशी झुंज देणारा मानव, व्यक्तीगत आयुष्यात समस्यांशी झुंज देणारा मानव, भारतातील कौटुंबिक समस्या, कुंटुंब या आमच्या वारश्याबद्दल जेव्हा जगाला समजते, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. आम्ही ही कला शिकलोय, शतकानुशतकांपासून शिकत आलोय. पण जर त्यावर ओरखडा उमटत असेल, तर ते सर्व पुन्हा ठिक करण्याची गरज आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून जे काम होते आहे, त्याबद्दल मी अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो. या भव्य समारंभाद्वारे भारताचे वेगळे रुप जगासमोर आणल्याबद्दल सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन करतो.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai