Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पटना उच्च न्यायालयाच्या शताब्दी वर्ष समारंभाच्या समारोप प्रसंगी संबोधित केले

पंतप्रधानांनी पटना उच्च न्यायालयाच्या शताब्दी वर्ष समारंभाच्या समारोप प्रसंगी संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पटना उच्च न्यायालयाच्या शताब्‍दी वर्ष समारंभाच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित केले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 100 वर्षांमध्ये या न्यायालयाने अनेक उंची गाठल्या आहेत. या 100 वर्षांमधील चांगल्या बाबी भविष्यात देखील सुरु ठेवल्या पाहिजेत. नवीन संकल्प करण्याचा हा चांगला प्रसंग आहे असे सांगत, मोदींनी सर्व लाभधारकांना येणाऱ्या वर्षांमध्ये नवीन मानक स्थापित करण्याचे आवाहन केले.

तंत्रज्ञानाच्या महान ऊर्जेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पीठं आणि न्यायालयाला तंत्रज्ञानाची माहिती हवी. तंत्रज्ञानाच्या सक्रिय उपयोगामुळे वादविवाद आणि निर्णयांचा दर्जा सुधारेल असेही मोदींनी यावेळी सांगितले.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai