Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदी यांचे निवडणुकीतील यशाबद्दल केले अभिनंदन


राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआला निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जिनपिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत-चीन संबंधांना गती मिळण्यासाठी वाटणारे महत्व आणि दोन्ही देशांमधली विकास भागीदारी नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात संयुक्त प्रयत्नांतून भारत-चीन संबंध विकसित होण्यासाठी मिळालेल्या वेगवान गतीबद्दल राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी समाधान व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली

23 मे 2019

M.Chopade/S.Kakade/D.Rane