Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सणांनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

विविधतेत एकता, सलोखा आणि बंधुभाव यांचे पर्व !

येत्या दिवसात भारतातली जनता विविध सण साजरे करणार आहे. यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट राहो.

सर्वांना बैसाखीच्या शुभेच्छा. हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात उत्तम आरोग्य आणि सुयश आणणारा ठरो. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याच्या मेहनतीला सलाम.

ओदिशा समुदायाला नववर्षाच्या शुभेच्छा. नवे वर्ष, नव्या आशा-आकांक्षा या महा विशुब संक्राती पर्वात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

तामिळनाडूच्या प्रिय बंधु-भगिनींनो, आपणाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुथंडूच्या या बंधु-भगिनीना शुभेच्छा. तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांना आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या संदेशांद्वारे व्यक्त केल्या आहेत.

N.Sapre/N.Chitale/D.Rane