पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) संघटीत गट ‘ए’ चा दर्जा तसेच 24.4.2009 आणि 6.6.2000 च्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 1.1.2006 पासून अकार्यरत वित्तीय दर्जा उंचावण्याचे लाभ आणि 6.6.2000 पासून सिनिअर ड्यूटी पोस्टच्या 30 टक्क्यांप्रमाणे अकार्यरत निवड श्रेणी द्यायला मंजुरी दिली आहे.
प्रमुख प्रभाव
आरपीएफला संघटीत गट ‘ए’ दर्जा दिल्यामुळे अधिकाऱ्यांची प्रगती होईल आणि त्यांना द्यावयाच्या प्रोत्साहन पातळीत वाढ होईल. आरपीएफच्या पात्र अधिकाऱ्यांना याचा लाभ होईल.
पार्श्वभूमी
दिल्ली उच्च न्यायालयाने 4.12.2012 च्या आदेशात रेल्वेला आरपीएफला गट ‘ए’ सेवेचा दर्जा देण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने 5.2.2019 रोजी हा आदेश कायम ठेवला. त्यानुसार रेल्वेने यासंदर्भात शिफारस केली.
B.Gokhale/S.Kane/P.Kor