Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एक्झिम बँकेच्या निर्यात विकास निधीमार्फत भारतातून इराणला केल्या जाणाऱ्या निर्यातीला वित्तीय पाठबळ


एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इराणच्या नेतृत्चाखालचा इराणी बँकांचा समूह यांच्यात झालेल्या कराराची कक्षा वाढवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. याअंतर्गत भारताकडून इराणला केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांची निर्यात 900 कोटी रुपयांवरुन 3000 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी वित्तीय पाठबळ पुरवले जाईल. ईडीएफ म्हणजे निर्यात विकास निधीचा वापर करत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या प्रस्तावामुळे भारताकडून इराणला केल्या जाणाऱ्या निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. धोरणात्मक भागीदार म्हणून भारत आणि इराण यांचे संबंधही यामुळे दृढ होणार आहेत. भारतीय कंपन्यांना इराणमध्ये आपला व्यवसाय करण्याची संधीही यामुळे मिळणार असून इराणबरोबर व्यापार आणि गुंतवणूकही वाढण्यासाठी मदत होणार आहे. भारतात रोजगार वृध्दीसाठीही याचा फायदा होणार आहे.

N.Chitle/ S.Tupe / M. Desai