Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केरळ मंदीर आग : पंतप्रधानांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्लम येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या आगीत जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये मदतीचीही घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

पंतप्रधान परिस्थितीवर लक्ष ठेवून असून यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. पंतप्रधान लवकरच केरळला जात असून, केरळमध्ये आगमन झाल्यानंतर शिष्टाचाराची औपचारिकता पाळू नये आणि मदत तसेच बचाव कार्यावर लक्ष्य केंद्रीत करावे असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. पंतप्रधानांसोबत तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथकही केरळला जात आहे.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai