Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि बांगलादेश दरम्यान मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, भारत आणि बांगलादेश दरम्यान, सप्टेंबर 2011 मध्ये मत्स्य व्यवसाय आणि संबंधित क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याबाबत, सामंजस्य करारावर झालेल्या स्वाक्षऱ्याबाबत माहिती देण्यात आली.

या सामंजस्य करारामुळे भारत आणि बांगलादेशमधील मैत्रीपूर्ण संबंध मजबूत झाले असून मत्स्यव्यवसाय तसेच संबंधित क्षेत्राात सहमतीने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीद्वारे सहकार्य विकासाला चालना मिळाली आहे. हा सामंजस्य करार पाच वर्ष अंमलात राहणार आहे. हा करार रद्द करण्याच्या हेतूबाबत दोन्ही बाजू किमान 6 महिने आधी पूर्व लेखी सूचना देत नाहीत तोवर दोन्ही बाजूंच्या संमतीने हा सामंजस्य करार आणखी कालावधीसाठी वाढवता येऊ शकेल.

J.Patnakar/B.Gokhale