पीएम्इंडिया

मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह तोमर, डॉक्टर हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक आणि या संपूर्ण अभियानाचे नेतृत्व जे सांभाळत आहेत ते किरेन रिजिजू, इथे उपस्थित सर्व वरिष्ठ मान्यवर, क्रीडाविश्वातील सगळे तारे, आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो,
काही लोकांना वाटत असेल की आपण तर शाळेत जात नाही, महाविद्यालयात जात नाही , मात्र मोदीजींनी केवळ विद्यार्थ्यांनो असे का म्हटले. तुम्ही लोकं इथे आला आहात, वय काही असेल, मात्र मला विश्वास आहे की तुमच्यातील विद्यार्थी जिवंत आहे.
तुम्हा सर्वाना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनेक-अनेक शुभेच्छा. आजच्याच दिवशी आपल्याला मेजर ध्यानचंद यांच्या रूपाने एक महान खेळाडू लाभला होता. आपली तंदुरुस्ती, क्षमता आणि हॉकी स्टिकने त्यांनी जगाला मंत्रमुग्ध केले होते. अशा मेजर ध्यानचंद याना मी आज आदरपूर्वक नमन करतो.
आजच्या दिवशी Fit India Movement, उपक्रम सुरु करण्यासाठी एका सुदृढ भारताच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आणि या संकल्पनापासून अभियानापर्यंत, प्रवासासाठी मी क्रीडा मंत्रालयाला, युवा विभागाला खूप-खूप शुभेच्छा देतो.
इथे आज जे सादरीकरण झाले, या सादरीकरणात प्रत्येक क्षणाला तंदुरुस्तीसाठी काही ना काही संदेश होता. परंपरांचे स्मरण करत सहजरित्या आपण स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवू शकतो, ते अतिशय उत्तम प्रकारे दाखवण्यात आले. आणि या गोष्टी इतक्या उत्तम प्रकारे सादर झाल्या कि मला माझ्या भाषणाची गरज भासत नाही. इथे सादरीकरणात ज्या गोष्टी सांगण्यात आल्या , त्याच जर आपण लक्षात ठेवल्या आणि एखाद-दोन गोष्टींना आयुष्याचा भाग बनवले, तर मला नाही वाटत कि तंदुरुस्तीसाठी माझ्या कुठल्या उपदेशाची गरज पडेल?
या उत्तम कार्य रचनेसाठी, या उत्तम सादरीकरणाबद्दल ,ज्यांना याची संकल्पना सुचली, ज्यांनी यामध्ये नवे नवे रंग-रूप भरले, आणि ज्यांनी परिश्रम घेऊन त्याचे सादरीकरण केलं , तुम्ही सर्व खूप-खूप अभिनंदनाला पात्र आहात. भविष्यात माझी योजना आहे कि यातूनच एक चांगला व्यावसायिक व्हिडिओ तयार करून सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये दाखवला जावा ,जेणेकरून सहजरित्या ती एक लोकचळवळ बनायला हवी.
मित्रानो,
आजचा हा दिवस आपल्या त्या युवा खेळाडूंचे अभिनंदन करण्याचा देखील आहे जे कायम जगाच्या मंचावर तिरंग्याची शान नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, धावणे असेल , मुष्टियुद्ध असेल किंवा कुस्ती असेल, किंवा अन्य दुसरे खेळ असतील, आपले खेळाडू नेहमीच आपल्या इच्छा -आकांक्षाना नवे पंख लावत आहेत. त्यांनी जिंकलेले प्रत्येक पदक त्यांच्या तप आणि तपस्येचे फळ आहेच, ते नवीन भारताचा नवा जोश आणि नव्या आत्मविश्वासाचा संदेश देखील आहे. मला आनंद आहे कि गेल्या पाच वर्षात भारताच्या खेळांसाठी उत्तम वातावरण निर्माण करण्याचे जे प्रयत्न झाले, त्याचे लाभ आज आपल्याला दिसत आहेत.
मित्रानो, खेळांचा थेट संबंध आहे तंदुरुस्तीशी , मात्र आज ज्या फिट इंडिया अभियानाची सुरुवात झाली, त्याचा विस्तार खेळाच्या पलिकडे नेऊन पुढे जाण्याचा आहे. फिटनेस किंवा तंदुरुस्ती हा एक शब्द नहीं तर निरोगी आणि समृद्ध जीवनाची एक आवश्यक अट आहे. आपल्या संस्कृतीत तर नेहमीच तंदुरुस्तीवर खूप जास्त भर देण्यात आला आहे. कुठल्याही आजारानंतर पथ्यपाण्यापेक्षा आपण उत्तम आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांना प्राधान्य दिले आहे. ते श्रेष्ठ मानले आहेत. तंदुरुस्ती आपल्या आयुष्याचा सहज भाग बनला आहे. आणि आपल्याकडे तर आपल्या पूर्वजांनी, आपल्या सहकाऱ्यानी नेहमीच म्हटले आहे –
व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥
म्हणजेच व्यायामाद्वारेच आरोग्य, दीर्घायुष्य, सामर्थ्य आणि सुख प्राप्त होते. निरोगी असणे हे परम भाग्य आहे, आणि आरोग्याद्वारेच अन्य सर्व कार्य सिद्धीला जातात. मात्र काळाच्या ओघात व्याख्या बदलत गेल्या, पूर्वी आपल्याला शिकवले जायचे , आपल्याला ऐकायला मिळायचे की आरोग्याद्वारेच सर्व कार्य सिद्धीला जातात, आता ऐकायला मिळते कि स्वार्थातूनच सर्व कार्य सिद्धीस जातात. आणि म्हणूनच ही स्वार्थी भावना स्वास्थ्य भावनेपर्यंत पुन्हा घेऊन जाण्याचा एक सामूहिक प्रयत्न प्रयास आवश्यक बनला आहे.
मित्रानो,
मला माहित आहे काही जण असा विचार करत असतील की तंदुरुस्ती आवश्यक आहे हे आम्हाला माहित आहे, मग अचानक अशा प्रकारच्या चळवळीची आवश्यकता काय आहे मित्रानो, आवश्यकता आहे,आणि आज कदाचित अधिक आवश्यकता आहे. तंदुरुस्ती हा आपल्या आयुष्यातील पद्धती, आपले राहणीमान याचा एक अविभाज्य घटक आहे . मात्र हे देखील खरे आहे कि काळानुसार तंदुरुस्ती संबंधी आपल्या समाज जीवनात, आपल्या समाजात एक प्रकारची उदासीनता आली आहे.
काळ कसा बदलला आहे, त्याचे एक उदाहरण मी तुम्हाला देतो. काही दशकांपूर्वी पर्यंत एक सामान्य व्यक्ती एका दिवसात 8-10 किलोमीटर पायी चालायची, एखाद तास सायकल चालवायची, कधी बस पकडण्यासाठी धावायची. म्हणजेच आयुष्यात शारीरिक कसरती सहज व्हायच्या. मग हळूहळू तंत्रज्ञान बदलले, आधुनिक साधने आली आणि माणसाचे पायी चालणे कमी झाले. शारीरिक कष्टाची कामे कमी झाली. आणि आता स्थिति काय आहे ? तंत्रज्ञानाने आपली ही स्थिती केली आहे कि आपण चालतो कमी आणि तेच तंत्रज्ञान आपल्याला मोजमाप करून सांगते कि आज तुम्ही इतकी पावले चाललात, अजून 5 हजार पावले झाली नाहीत, 2 हजार पावले झाली नाहीत आणि आपण मोबाइल फोन पाहत राहतो. इथे उपस्थित तुमच्यापैकी किती लोक 5 हजार, 10 हजार पावले चालणारी कामे करतात? अनेकजण असतील ज्यांनी अशा प्रकारचे घड्याळ हातावर बांधले असेल किंवा मोबाईल फोन मध्ये ऍप डाऊनलोड केले असेल. मोबाईलवर तपासत असतात कि आज किती चाललो.
मित्रानो,
तुमच्यापैकी अनेकजण सजग आहेत, सतर्क आहेत , मात्र देशात अशा लोकांची देखील संख्या खूप मोठी आहे जे आपल्या दैनंदिन आयुष्यात एवढे व्यग्र आहेत की आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊ शकत नाहीत. यातले काहीजण तर आणखी खास आहेत. आणि तुम्ही पाहिले असेल काही गोष्टी फैशन स्टेटमेंट बनतात. आणि म्हणूनच तंदुरुस्तीबाबत मित्रमंडळीत जरा बोलावे- जेवणाच्या टेबलवर बसले आहात, भरपूर खात आहात , गरजेपेक्षा दुप्पट खाल्ले आहे आणि अगदी आरामात डाएटिंग संबंधी चर्चा करत असतात.महिन्याभरात किमान दहा दिवस तुम्ही अनुभवत असाल कि तुम्ही जेवणाच्या टेबलवर बसला आहात , भरपूर खात आहात आणि अगदी मजेत डायटिंग वर छान-छान उपदेश देत आहात . म्हणजेच हे लोक उत्साहात चर्चा देखील करतात आणि याच्याशी संबंधित गैजेट विकत घेत असतात आणि लक्ष ठेवून असतात की असे एखादे गैजेट असेल ज्यामुळे माझा फिटनेस व्यवस्थित होईल. आणि तुम्ही पाहिले असेल, घरात तर खूप मोठी व्यायामाची साधने असतात, तंदुरुस्त राहण्यासाठी सगळे काही असते, मात्र त्याच्या साफसफाईसाठी नोकर ठेवावे लागतात कारण त्याचा कधी वापर करतच नाही आणि काही दिवसांनंतर ते सामान घरातल्या अडगळीच्या खोलीत ठेवले जाते. लोक मोबाईलवर फिटनेसवाले ऍप डाउनलोड करण्यात सगळ्यात पुढे असतात मात्र काही दिवसांनंतर त्या ऍप कडे ढुंकूनही पाहत नाहीत.
माझा जन्म गुजरात मध्ये झाला. आमच्याकडे गुजरातमध्ये एक ज्योतीन्द्र भाई दवे नावाचे अतिशय उत्तम प्रकारचे विनोदी लेखक होते. व्यंगात्मक लिखाण करायचे. आणि अतिशय रंजक लिहायचे. आणि बऱ्याचदा ते स्वतःवर व्यंगात्मक लिहायचे. आपल्या शरीराचे ते वर्णन करायचे – ते म्हणायचे मी कुठे उभा राहिलो, भिंतीजवळ उभा राहिलो तर लोकांना वाटायचे कि हॅंगरवर काही कपडे लटकत आहेत, म्हणजे ते एवढे सडपातळ होते कि असे वाटायचे कि हॅंगरवर कपडे लटकत आहेत,कुणी हे मानायलाच तयार नसायचे कि मी एक माणूस तिथे उभा आहे. ते पुढे लिहायचे कि जेव्हा मी घरातून निघतो तेव्हा माझ्या खिशात दगड भरून निघतो. ते कोट घालायचे , सगळ्या खिशांमध्ये दगड भरायचे. तेव्हा लोकांना वाटायचे कदाचित मी दगडफेक करेन, कुणाला मारेन . तेव्हा लोक मला विचारायचे -एवढे दगड घेऊन का चालता? तेव्हा ते म्हणाले कि मला भीती वाटते, जोरात वारा आला तर उडून तर जाणार नाही ना. अशा खूप मजेदार गोष्टी ते लिहायचे. एकदा कुणीतरी त्यांना सांगितले की दगड बिगड घेऊन जाण्याऐवजी तुम्ही थोडा व्यायाम करत जा, व्यायामशाळेत जा. तेव्हा त्यांनी त्या सद्गृहस्थाला विचारले कि किती व्यायाम करायला हवा, ते म्हणाले घामाघूम व्हाल एवढा सुरुवातीला करा. व्यायामशाळेत जा आणि घाम येईपर्यंत व्यायाम करा. तर म्हणाले- ठीक आहे, उद्यापासून जैन. दुसऱ्या दिवशी म्हणाले- मी व्यायामशाळेत गेलो आणि हे आपले कुस्तीपटू असतात ते आखाड्यात कुस्ती खेळत होते. म्हणाले- जाऊन मी पाहायला लागलो आणि ते पाहताना मला घाम सुटला, तेव्हा मला वाटले कि माझा व्यायाम पूर्ण झाला. म्हणजेच ही गोष्ट हसण्यासारखी आहेच, विनोद आपल्या जागी, मात्र आरोग्यासाठी चांगला देखील आहे, परंतु काही चिंता यापेक्षा मोठ्या आहेत.
आज भारतात मधुमेह, अतिताण सारखे जीवनशैलीशी निगडित आजाराचे प्रमाण वाढत आहे.कधी-कधी तर ऐकायला मिळते कि कुटुंबात 12-15 वर्षांच्या मुलाला मधुमेह आहे. आपल्या आजूबाजूला पाहिलंत तर तुम्हाला अनेक लोक या रोगाने ग्रासलेले आढळतील. पूर्वी आपण ऐकायचो कि वयाच्या 50-60 वर्षांनंतर हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो, मात्र आज कधी-कधी बातमी येते 30 वर्षे , 35 वर्षे , 40 वर्षाचा तरुण मुलगा-मुलगी आकस्मित गेले. ,हृदयविकाराचा झटका येत आहे. ही स्थिति खरेच खूप चिंताजनक आहे, मात्र या सगळ्या परिस्थितीतही आशेचा एक किरण अजूनही आहे. आता तुम्ही विचार कराल कि या आजारांमध्ये आशेच्या किरणाबाबत मी कसे काय बोलू शकतो. माझा स्वभाव सकारात्मक विचार करण्याचा आहे. म्हणूनच मी त्यातूनही काही चांगल्या गोष्टी शोधून काढतो.
मित्रानो,
जीवनशैलीतील बेशिस्तीमुळे जीवनशैलीशी निगडित आजार होत आहेत. आता जीवनशैलीत बदल करून आपण ते ठीक करू शकतो. असे अनेक आजार आहेत जे आपण आपल्या दिनचर्येत छोटे-छोटे बदल करून , आपल्या जीवनशैलीत बदल करून आपण त्यापासून वाचू शकतो , त्यांना दूर ठेवू शकतो. या बदलांसाठी देशाला प्रेरित करण्याचे नावच फिट इंडिया अभियान आहे. आणि हे काही सरकारी अभियान नाही. सरकार तर एक प्रसारक म्हणून हा विषय पुढे नेईल,मात्र एक प्रकारे प्रत्येक कुटुंबांचा हा कार्यक्रम बनायला हवा, प्रत्येक कुटुंबाच्या चर्चेचा विषय बनायला हवा. व्यापारी दर महिन्याला हिशोब करतो किती कमाई केली, शिक्षणात रस असलेल्या कुटुंबात चर्चा असते मुलांना किती गुण मिळाले , त्याच प्रकारे कुटुंबांमध्ये सहजरित्या शारीरिक श्रम, शारीरिक व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती हे दैनंदिन आयुष्याबाबत चर्चेचे विषय बनायला हवेत.
आणि मित्रानो, भारतातच अचानक अशा प्रकारची गरज निर्माण झाली आहे असे नाही. काळानुरूप हे बदल केवळ भारतातच होत आहेत असेही नाही. संपूर्ण जगात आज अशा प्रकारच्या अभियानांची गरज जाणवू लागली आहे. अनेक देश आपल्याकडे तंदुरुस्तीबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ-मोठे अभियान राबवत आहेत.आपल्या शेजारचा चीन -सुदृढ चीन 2030, साठी मिशनमोड मध्ये काम करत आहे.म्हणजेच २०३० पर्यंत चीनचा प्रत्येक नागरिक तदुरुस्त असावा यासाठी त्यांनी संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे. अशाच प्रकारे ऑट्रेलिया आपल्या नागरिकांची शारीरिक सक्रियता वाढवण्याचे आणि निष्क्रियता म्हणजेच आळशीपणा जो आहे, काही करायचे नाही, हा स्वभाव बदलण्यासाठी त्यांनी उद्दिष्ट निश्चित केले आहे की 2030 पर्यंत देशातील 15 टक्के नागरिकांना आळशीपणातून बाहेर काढून तंदुरुस्तीसाठी, सक्रियतेसाठी आपण काम करायचे.ब्रिटनमध्ये दणक्यात अभियान सुरु आहे कि 2020 पर्यंत पाच लाख नवीन लोक दररोज व्यायाम करतील हे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले आहे. अमेरिका 2021पर्यंत आपल्या एक हजार शहराना मोफत तंदुरुस्ती अभियानाशी जोडण्याचे काम करत आहे. जर्मनीत देखील फिट इन्स्टेड ऑफ फॅट हे मोठे अभियान सुरु आहे.
मित्रानो, मी तुम्हाला काही निवडक देशाचीच नावे सांगितली आहेत. अनेक देश खूप आधीपासून यावर काम करत आहेत. या सर्व देशातील लोक तंदुरुस्त राहण्याची गरज जाणून आहेत , मात्र तरीही त्यांनी आपल्या इथे विशेष अभियान सुरु केले आहे. विचार करा – पण का ? कारण केवळ काही लोक तंदुरुस्त राहिल्यामुळे नव्हे तर संपूर्ण देश तंदुरुस्त राहिला तर देशाचा फायदा होईल. नवभारताचा प्रत्येक नागरिक तंदुरुस्त असावा, आपली ऊर्जा आजारांवरील उपचारात नव्हे तर स्वतःला पुढे नेण्यासाठी , आपले कुटुंब, आपळ्या देशाला पुढे नेण्यासाठी वापरावी या दिशेने आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे आहे.
मित्रानो,
आयुष्यात जेव्हा तुम्ही एक लक्ष्य ठरवता तेव्हा त्या लक्ष्यानुसार आपले आयुष्य आकार घेत असते. आयुष्य पुढे जात राहते , आपल्या सवयी तशा बनतात, आपली दिनचर्या त्यानुसार बनते. आपल्याला सकाळी आठ वाजता उठायची सवय असेल , मात्र कधी सकाळी 6 वाजता विमान पकडायचे असेल, ६ वाजता ट्रेन पकडायची असेल तर आपण उठतोच, तयार होऊन निघतो. एखाद्या विद्यार्थ्याने जर हे ठरवले कि मला 10वीं किंवा 12वीं च्या बोर्डाच्या परीक्षेत कमीतकमी एवढे टक्के मिलवायचेच आहेत तर तुम्ही पाहिले असेल कि तो स्वतःमध्ये खूप मोठा बदल घडवणे सुरु करतो.आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या धुंदीत त्याचा आळस नष्ट होतो, त्याची बसण्याची क्षमता वाढते, त्याची एकाग्रता क्षमता वाढते, तो मित्रांबरोबरचा वेळ हळूहळू कमी करत जातो, खाण्याच्या सवयी कमी करतो, टीव्ही पाहणे बंद करतो, म्हणजे आयुष्याला आकार देत असतो कारण मला हे करायचे हे मनात निश्चित झालेले असते.
अशाच प्रकारे जर कुणी आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट संपत्ती जमवण्याचे निश्चित करतो तेव्हा त्याचेही आयुष्य बदलते. तो चोवीस तास आपले उद्दिष्ट साध्य करण्यात गुंतून जातो. तसेच जेव्हा आयुष्यात तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण होते, आरोग्याबाबत सजगता येते, मनाने एकदा ठरवले कि आता मी अजिबात थकणार नाही, कधीही दम लागणार नाही, चालावे लागले तर चालेन , धावावे लागले तर धावेन , चढावे लागले तर चढेन , थांबणार नाही. तुम्ही बघा, हळूहळू तुमची जीवन दिनचर्या तशीच व्हायला लागेल. आणि मग अशा गोष्टी ज्या शरीराला नुकसान पोहचवतात, त्यापासून ती व्यक्ती दूर राहते कारण त्याच्यामध्ये एक सतर्कता येते, तो जागरूक बनतो. जसा तो अमली पदार्थांच्या आहारी कधी जाणार नाही, त्याच्यासाठी ड्रग्स हे स्टाईल स्टेटमेंट बनणार नाही.
मित्रानो,
स्वामी विवेकानंदजी देखील म्हणायचे कि जर आयुष्यात उद्दिष्ट असेल, पूर्णपणे झोकून देऊन त्यासाठी काम केले तर उत्तम आरोग्य, सुख-समृद्धि त्याची बाय प्रॉडक्ट स्वरूपात तुमच्या आयुष्यात येतात. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्यामध्ये ध्यास, एक इच्छाशक्ति, एकाग्रता असणे देखील तेवढेच आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या हेतूने, मनापासून आपण काम करतो, पुढे जातो, तेव्हा यश आपल्या पायाशी यायला तयार असते. आणि यशाबाबत तुम्ही तो वाक्प्रचार ऐकला असेल, –There is no elevator to success, you have to take the stairs. म्हणजेच यातही तुम्हाला जिन्याच्या पायऱ्या चढण्यासाठीच सांगितले आहे. पायऱ्या तुम्ही तेव्हाच चढू शकाल जेव्हा तंदुरुस्त असाल नाहीतर लिफ्ट बंद पडली तर विचार कराल , जाऊदे, आज नको जाऊया , कोण चौथ्या मजल्यावर जाईल.
बंधू आणि भगिनींनो,
यश आणि तंदुरुस्तीचे नाते देखील एकमेकांशी जोडलेले आहे. आज तुम्ही कुठलेही क्षेत्र घ्या, आपल्या आदर्श व्यक्तीकडे पहा, त्यांच्या यशोगाथा पहा, मग ते खेळातील असेल, सिनेमातील असेल, व्यवसायातील असेल, यापैकी बहुतेकजण तंदुरुस्त आहेत. हा केवळ योगायोग नाही. जर तुम्ही त्यांच्या जीवनशैलीसंबंधी वाचाल तर तुम्हाला आढळेल कि एक गोष्ट अशा प्रत्येक व्यक्तीत समान आहे. यशस्वी लोकांचे समान वैशिष्ट्य आहे -तंदुरुस्त राहण्यावर त्यांचा भर, तंदुरुस्त राहण्याचा त्यांचा विश्वास . तुम्ही अनेक डॉक्टरांना देखील पाहिले असेल , खूप लोकप्रिय असतात आणि दिवसभरात 10-10, 12-12 तास अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करतात. अनेक उद्योजक सकाळी एका शहरात एक बैठक करतात, दुसऱ्या शहरात दुसरी बैठक घेतात, त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. तेवढ्याच सजगतेने ते काम करत असतात. तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल , तुम्हाला तुमच्या व्यवसायात कार्यक्षमता आणायची असेल तर मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती खूप आवश्यक आहे. बोर्डरुम असेल किंवा बॉलिवूड , जो तंदुरुस्त असेल तो आकाशाला गवसणी घालतो. शरीर तंदुरुस्त तर मन आणि मेंदू देखील शांत राहील.
मित्रानो,
जेव्हा आपण तंदुरुस्तीकडे लक्ष देतो तेव्हा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यातून आपल्याला आपले शरीर जाणून घ्यायची संधी मिळते. ही खेदाची बाब आहे की आपल्याला आपल्या शरीराबाबत, आपली ताकद, आपल्या त्रुटी बाबत खूप कमी माहिती असते.म्हणूनच जेव्हा आपण तंदुरुस्तीच्या प्रवासाला निघतो, तेव्हा आपल्या शरीराला उत्तम प्रकारे जाणून घ्यायला सुरुवात करतो. आणि मी अशी अनेक लोकं पाहिली आहेत ज्यांनी अशाच प्रकारे आपल्या शरीराची ताकद ओळखली आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला आहे, ज्यामुळे एका उत्तम व्यक्तिमत्व विकासात त्यांना मदत मिळाली आहे.
मित्रानो,
फिट इंडिया अभियान भले ही सरकारने सुरु केला आहे, मात्र याचे नेतृत्व तुम्हा सर्वांना करायचे आहे. देशाची जनताच हे अभियान पुढे नेईल आणि यशाच्या शिखरावर पोहचवेल. मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगू शकतो कि यात गुंतवणूक शून्य आहे मात्र परतावा अमर्याद आहे.
इथे मंचावर मनुष्यबळ विकास मंत्री, ग्रामीण विकास मंत्री देखील आहेत. माझी त्यांना विशेष विनंती आहे कि देशातील प्रत्येक गावात, देशातील प्रत्येक पंचायतीत, देशातील प्रत्येक शाळेत हे अभियान पोहचायला हवे. हे अभियान केवळ एका मंत्रालयाचे नाही, केवळ सरकारचे नाही, हे सरकार मग ते केंद्राचे असो, राज्याचे असो, नगरपालिका असो, पंचायत असो, कुणीही पक्ष असो, कुठलीही विचारसरणी असो, तंदुरुस्तीबाबत कुणालाही काही समस्या असायला नको.संपूर्ण देश, प्रत्येक कुटुंबाने यावर भर द्यायला हवा. आता आपण कार्यक्रमात पाहिले, आपल्याकडे तंदुरुस्तीबरोबरच वीरतेचे देखील माहात्म्य आहे. मात्र दुर्दैवाने मर्यादित विचारसरणीमुळे आपण आपल्या परंपरामुळे गाडी रुळावरून घसरली आहे.कधी आपल्याकडे जे 60-70-80 वर्ष वयाचे लोक असतील, जेव्हा ते शाळेत शिकत होते तेव्हा त्यांना ‘त ‘ तलवारीचा शिकवले जात होते. त्यांनतर काही बुद्धिजीवी लोकांनी वाद निर्माण केला. मर्यादित विचारांचा हा परिणाम होता. मुलांना ‘त ‘ तलवारीचा शिकवल्यामुळे त्यांच्यात हिंसक मनोवृत्ति निर्माण होते. मग काय करायचे, तलवार काढून टाका, ‘त ‘ तरबूजचा शिकवा. म्हणजेच आपण कशा प्रकारे मनोवैज्ञानिक रित्या आपल्या महान परंपरांच्या माध्यमातून वीरता, शारीरिक सामर्थ्य , तंदुरुस्ती यांच्यावर खोलवर घाव केले आहेत.
आणि म्हणूनच आपण तंदुरुस्तीला एक उत्सव म्हणून, जीवनाचा एक भाग म्हणून, कुटुंबाच्या यशाचे जितके मानक आहेत त्यामध्ये तंदुरुस्ती हा देखील कुटुंबाच्या यशाचा मानक असायला हवा असे मला वाटते. ही भावना आपण मनात बाळगून पुढे जायला हवे, मी राज्य सरकारांनाही सांगेन की फिट इंडिया अभियानाचा अधिकाधिक विस्तार करण्यासाठी , हे अभियान देशातील दुर्गम भागात पोहचवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. आपल्या शाळांमध्ये, आपल्या कार्यालयांमध्ये , आपल्या राज्यातील लोकांमध्ये तंदुरुस्तीबाबत जागरूकता वाढवून त्यासाठी आवश्यक संसाधने एकत्र करून आपण जास्तीत जास्त लोकांना दररोज आपला काही वेळ व्यायामासाठी देण्यासाठी प्रेरित करायला हवे. निरोगी व्यक्ति, निरोगी कुटुंब हाच नवीन भारताला श्रेष्ठ भारत बनवण्याचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे तुम्ही स्वच्छ भारत अभियान आपल्या आयुष्याचा भाग बनवलंत त्याचप्रमाणे फिट इंडिया अभियानाला देखील आपल्या आयुष्याचा भाग बनवायचे आहे.
चला, आज तुम्ही हा संकल्प करा, ही प्रतिज्ञा घ्या कि तुम्ही स्वतः देखील तंदुरुस्त राहाल , आपले कुटुंब, आपली मित्रमंडळी, शेजारी आणि ज्यांना ज्यांना तुम्ही ओळखता त्या सर्वाना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहित कराल. मी फिट तर इंडिया फिट.
याच एका विनंतीसह पुन्हा एकदा या अभियानासाठी देशबांधवांना माझ्या अनेक -अनेक शुभेच्छा . आणि समाजातील प्रत्येक वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांना मी विनंती करतो कि तुम्ही पुढे या, या अभियानाला बळ द्या, समाजाला सुदृढ करण्यात तुम्ही देखील वाटेकरू व्हा. या एकाच अपेक्षेसह अनेक-अनेक शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार.
D.Wankhede/S.Kane/P.Malandkar
आज का ये दिन हमारे उन युवा खिलाड़ियों को बधाई देने का भी है, जो निरंतर दुनिया के मंच पर तिरंगे की शान को नई बुलंदी दे रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
बेडमिंटन हो, टेनिस हो, एथलेटिक्स हो, बॉक्सिंग हो, कुश्ती हो या फिर दूसरे खेल, हमारे खिलाड़ी हमारी उम्मीदों और आकांक्षाओं को नए पंख लगा रहे हैं: PM
उनका जीता हुआ मेडल, उनके तप और तपस्या का परिणाम तो है ही, ये नए भारत के नए जोश और नए आत्मविश्वास का भी पैमाना है: PM
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
Sports का सीधा नाता है Fitness से।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
लेकिन आज जिस Fit India Movement की शुरुआत हुई है, उसका विस्तार Sports से भी आगे बढ़कर है।
Fitness एक शब्द नहीं है बल्कि स्वस्थ और समृद्ध जीवन की एक जरूरी शर्त है: PM
समय कैसे बदला है, उसका एक उदाहरण मैं आपको देता हूं।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
कुछ दशक पहले तक एक सामान्य व्यक्ति एक दिन में 8-10 किलोमीटर पैदल चल ही लेता था।
फिर धीरे-धीरे टेक्नोलॉजी बदली, आधुनिक साधन आए और व्यक्ति का पैदल चलना कम हो गया: PM
अब स्थिति क्या है?
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
टेक्नोलॉजी ने हमारी ये हालत कर दी है कि हम चलते कम हैं और अब वही टेक्नोलॉजी हमें गिन-गिन के बताती है कि आज आप इतने steps चले, अभी 5 हजार Steps नहीं हुए, 2 हजार Steps नहीं हुए, अभी और चलिए: PM
आज भारत में diabetes, hypertension जैसी अनेक lifestyle diseases बढ़ती जा रही हैं।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
अपने आसपास देखिए, तो आपको अनेक लोग इनसे पीड़ित मिल जाएंगे।
पहले हम सुनते थे कि 50-60 की उम्र के बाद हार्ट अटैक का खतरा बढ़ता है, अब 35-40 साल के युवाओं को हार्ट अटैक आ रहा है: PM
Lifestyle diseases हो रही हैं lifestyle disorders की वजह से।Lifestyle disorders को हम lifestyle में बदलाव करके ठीक कर सकते हैं।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
ऐसी बीमारियां हैं जिन्हें अपने lifestyle में छोटे बदलाव करके दूर कर सकते हैं। इन बदलावों के लिए देश को प्रेरित करने का नाम ही है #FitIndiaMovement :PM
सफलता और फिटनेस का रिश्ता भी एक दूसरे से जुड़ा हुआ है।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
आज आप कोई भी क्षेत्र लीजिए, अपने icons को देखिए, उनकी success stories को देखिए, चाहे वो Sports में हों, फिल्मों में हों, बिजनेस में हों, इनमें से अधिकतर फिट हैं: PM
ये सिर्फ संयोग मात्र नहीं है। अगर आप उनकी lifestyle के बारे में पढ़ेंगे तो पाएंगे, कि एक चीज ऐसे हर व्यक्ति में कॉमन है।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
सफल लोगों का Common character है - Fitness पर उनका फोकस: PM
आप किसी भी प्रोफेशन में हों, आपको अपने प्रोफेशन में Efficiency लानी है तो मेंटल और फिजिकल फिटनेस जरूरी है।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
चाहे Boardroom हो या फिर Bollywood, जो फिट है वो आसमान छूता है।
Body fit है तो Mind hit है: PM
आप किसी भी प्रोफेशन में हों, आपको अपने प्रोफेशन में Efficiency लानी है तो मेंटल और फिजिकल फिटनेस जरूरी है।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
चाहे Boardroom हो या फिर Bollywood, जो फिट है वो आसमान छूता है।
Body fit है तो Mind hit है: PM
जब फिटनेस की तरफ हम ध्यान देते हैं, फिट करने की कोशिश करते हैं, तो इससे हमें अपनी बॉडी को समझने का भी मौका मिलता है।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
ये हैरानी की बात है, लेकिन हम अपने शरीर के बारे में, अपनी ताकत, अपनी कमजोरियों के बारे में बहुत ही कम जानते हैं: PM
#FitIndiaMovement भले ही सरकार ने शुरु किया है, लेकिन इसका नेतृत्व आप सभी को ही करना है।
— PMO India (@PMOIndia) August 29, 2019
देश की जनता ही इस कैंपेन को आगे बढ़ाएगी और सफलता की बुलंदी पर पहुंचाएगी।
मैं अपने निजी अनुभवों से कह सकता हूं कि इसमें Investment Zero है, लेकिन Returns असीमित हैं: PM