Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले पी व्ही सिंधूचे अभिनंदन


जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचे अभिनंदन केले आहे.

“विलक्षण गुणवत्तेच्या पी व्ही सिंधूने जगात भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन! ज्या चिकाटीने आणि समर्पित वृत्तीने तिने बॅडमिंटन खेळात प्रावीण्य मिळवले आहे,ते खरोखरच प्रेरणादायी आहे. तिच्या या यशामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

*******

M.Chopade/R.Aghor/D.Rane