Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचे जगभरातल्या नामवंत व्यक्तींकडून कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्युस्टन इथे हाऊडी मोदी कार्यक्रमात दिलेल्या भाषणाचे अमेरिकेतल्या अनेक नामवंत व्यक्तींनी कौतुक केले आहे. यामध्ये रिपब्लिकन नेते पेट ओल्सन, केविन ब्रँडी, सिनेटर जॉन कॉर्नयन, सिनेटर केविन क्रामेर, सिनेटर टेड क्रुझ, मीसीसीपीचे गव्हर्नर फिल बायरंट, गव्हर्नर मॅट बेविन, ह्युस्टनचे मेयर सिल्वेस्टर टर्नर यांचा समावेश आहे. भारतातही विकास खन्ना, प्रसून जोशी, करण जोहर, अजय देवगण, मिलिंद देवरा आणि ऋषी कपूर अशा नामवंत व्यक्तींनी पंतप्रधानांच्या भाषणाचे कौतुक केले आहे. या सर्वांनी केलेल्या अभिनंदनाबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले आहेत.

*******

B.Gokhale/R.Aghor/D.Rane