Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात दरड कोसळलेल्या भागांमध्ये एक उच्च स्तरीय केंद्रीय पथक पाठवले


अरुणाचल प्रदेशातल्या तवांग जिल्ह्यात अलिकडेच दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सदस्यांचे एक केंद्रीय पथक अरुणाचल प्रदेशात पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पथकामध्ये नीति आयोगाचे एक वरिष्ठ सल्लागार आणि गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी पथकाला राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मदत आणि नुकसान भरपाई पॅकेजचे मूल्यमापन करण्याचे निर्देश दिले आहेत आणि अहवाल सादर करायला सांगितले आहे.

22 एप्रिल 2016 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. पंतप्रधानांनी यापूर्वीच तवांगमधील दरड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.

S. Kane / B. Gokhale