पीएम्इंडिया
मी सर्वप्रथम ईस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे आणि ईस्त्राोच्या संपूर्ण चमूचे मनापासून खूप खूप आभार मानतो. त्यांचे अभिनंदन करतो. मी सव्वाशे कोटी देशबांधवांना देखील या नवीन भेटी बद्दल अनेक शुभेच्छा देतो. अंतराळ विज्ञानांमध्ये भारताच्या वैज्ञानिकांनी अविरत प्रयत्न करुन मोठे यश मिळविले आहे आणि देशाला त्याची प्रचिती येत आहे. अंतराळ विज्ञानाच्या माध्यमातून, सामान्य माणसाच्या जीवनात केवढा बदल घडवून आणता येऊ शकतो. तंत्रज्ञान मनुष्याच्या जीवनात देखील कशा प्रकारे उपयोगी पडू शकते आणि भारताचा अंतराळ तंत्रज्ञाान क्षेत्रातील प्रवेश भारताच्या सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यांसाठी, सुलभतेसाठी एक खूप मोठी भूमीका पार पाडत आहे. आज दिशादर्शक क्षेत्रात भारताने आपला सातवा उपग्रह सोडला आहे. सातही उपग्रह एकापाठोपाठ एक यशस्वीपणे प्रक्षेपित केले गेले. आणि या यशामुळे भारत आज जगातील त्या पांच देशांबरोबर अभिामानाने उभा राहिला आहे. ज्यांची स्वत:ची जीपीएस प्रणाली, स्वत:ची दिशादर्शक उपग्रह प्रणाली निर्माण झाली आहे. आजपर्यंत आपण जीपीएस प्रणालीसाठी अन्य देशांच्या व्यवस्थांवर अवलंबून होतो. आज आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. आपले मार्ग आपण ठरवू, कसे जायचे, कुठे जायचे, कसे पोहचायचे हे आपल्या स्वत:च्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होईल.
म्हणूनच भारताचया वैज्ञानिकांनी आज 125 कोटी देशबांधवांना एक अनमोल भेट दिली आहे. आपल्याला माहितच आहे की, आपल्याला या युगाच्या जीपीएस् प्रणालीची खूप मोठी भूमीका आहे. आपला एक मच्छिमार देखील या प्रणालीअंतर्गत माशांची संख्या कुठे अधिक आहे, मासे पकडण्यांसाठी कुठे जायला हवे, जवळचा मार्ग कोणता असेल, हे आता भारतीय उपग्रहांच्या मार्गदर्शनाखाली काम करॅन ही माहिती मिळवेल. आकाशातून त्याला मार्ग दाखविला जाईल. उद्दिष्टाचा निश्चित पत्ता ठरवला जाईल. आता आपल्या विमानाना जर लँडिंग करायचे असेल तर खूप सहजपणे, अचूकपणे आपल्या भारतीय प्रणालीच्या सहाय्याने तो करु शकेल. कुठे कोणतीही आपत्ती आली, खूप मोठे नैसर्गिक संकट आले तर अशा परिस्थितीत मदत कशी पोहचवायची, कुठे पोहचवायची, विशिष्ट ठिकाण कोणते असेल ही संपूर्ण माहिती या भारतीय उपग्रहांच्या माध्यमांतून जी नवीन प्रण्णाली विकसित झाली आहे त्यामुळे उपयोगी ठरेल. याची क्षमता इतकी आहे की काश्मिर ते क न्याकुमारी,कच्छ ते कामरुप पर्यंत ती भारताच्या कानाकोप-यांत तर सेवा देईलच, मात्र त्या व्यतिरिक्त 1500 चौरस किलोमीटर परिसरात देखील ज्या कुणाला ही सेवा हवी असेल तर त्यासठी या सेवेचा लाभ मिळेल. सांगायचे तात्पर्य हे की आपल्या शेजारील जे सार्क देश आपल्याशी जोडलेले आहेत, ते देखील जर भारताच्या या सेवेचा लाभ घेऊ इच्छित असतील कारण आज ते देखील जगातील कोणत्या ना कोणत्या देशाची सेवा घेऊन आपली गुजराण करत आहेत. आता भारत देखील, जर त्यांना हवी असेल तर ही सेवा त्यांना उपलब्ध करु शकतो.
एक प्रकारे शतकांपूर्वी आपले नावाडी समुद्रांत उडी मरायचे. नात्यांच्या मदतीने चंद्र आणि सूर्याच्या गतीच्या सहाय्याने ते आपला मार्ग आखत होते आणि निर्धारीत ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत होते. अनेक वर्षांपासून आले नावाडी अनोख्या ठिकाणी पोहचत होते आणि आकाशातील तारे, चंद्र आणि सूर्याच्या गतीच्या सहाय्याने ते आपला मार्ग निश्चित करत होते. आता विज्ञानाच्या मदतीने, आपण या उपग्रह आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे काम करणार आहोत. भारताचे मच्छिमार, भारताचे नावाडी समुद्रात सहसा बरोबर चालत राहिलेली आपली शतकांपूर्वीची जूनी परंपरा. तीने एका अनोख्या ठिकाणी जाण्यांसाठी साहसी मार्ग शिकवीले आहेत आणि म्हणूनच हजारो वर्षांपासून मच्छिमारांनी जे साहस दाखविले, नावाडींनी ज्या दुर्दम्य साहसी वृत्तीने जगभरात पोहचण्याचा प्रयत्न केला आहे, आणि म्हणूनच या संपूर्ण नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणा-या सेवा, आज आपण ठरविले आहे की ही संपूर्ण प्रणाली, आली ही जीपीएस् प्रणाली नावीक या नावाने ओळखली जाईल.
या प्रणालीला मी देशाच्या कोटयवधी मच्छिमारांच्या शतकापूर्वीच्या परंपरांना आदर्श मानत देशातील गरीब मच्ठिमारांना ही संपूर्ण प्रणाली समर्पित करण्याच्या हेतूने, आज नाविक या नावाने जग तिला ओळखेल आणि नाविक नावाने ही सेवा आता उपलब्ध होईल. ही आपली नावीक असेल. आपल्या मोबाईल फोनमध्ये आपला नावीक असेल. जो नाविक आपण कुठे आहोत हे सांगू शकतो, कुठे जायचे आहे त्याचा मार्ग सांगू शकतो आणि कुठे पाहचायचे आहे त्याचा मार्ग देखील हा नावीक आपल्याला दाखवेल. आणि जेव्हां मी नावीक बद्दल बोलतोय, तंत्रज्ञानाच्या भाषेत जर मला सांगायचे असेल तर मी म्हणेन कि दिशादर्शक उपग्रह प्रणाली जी नेव्हिगेशन विथ इंडियन काँन्स्टेलेशन नाविक या स्वरुपात आज तुमच्या समोर समर्पित करतो.
सव्वाशे कोटी देश बांधवांना आज एक नवा नाविक मिळाला, नाविक जो आपल्याला आपले मार्ग ठरविण्यांसाठी आपले निर्धारित स्थान ठरविण्यांसाठी आपले अस्तित्व जाणून देण्यांसाठी उपयोगी ठरेल. हा अंतराळ कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरेल. हा जमीनीवरील व्यवस्थांसाठी उपयोगी ठरेल, हा पाण्याच्या व्यवस्थेसाठी देख्राील उपयोगी ठरेल. आपल्या नौवहन व्यवस्थेसाठी भारताची ही सेवा अधिक अचूकपणे उपलब्ध असेल.
आपली रेल्वे : आज आपली रेल्वे केव्हां कुठे आहे, हे जाणून घेण्यांसाठी जीपीएस चा वापर करावा लागतो. आता आपण कोणत्या क्रॉसिंग पासून रेल्वे कुठे पोहचली, किती सिग्नल पासून किती दूर आहे, कुठे रेल्वेच्या धावत्या गाडीत कोणता सिग्नल दयायचा असेल, सूचना दयायची असेल तर या नाविकाच्या सहाय्याने आपण देऊ शकतो. आपण गाडीतून जात आहोत , स्कूटर वरुन जात आहोत, आपल्या हातात मोबाईल फोन आहे, आपण नावीकच्या सहाय्याने ठरवू शकतो. कुठे पोहचलो, कुठे पोहचायचे आहे, कुठे उभे आहोत. एक प्रकारे सामान्य माणसांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम, आता आपल्या वैज्ञानिकांनी “मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, मेड फॉर इंडियन” हे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. मला आज या शुभ प्रसंगी सव्वाशे कोटी देश बांधवांना आपला नाविक देताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. आणि मी देशाच्या वैज्ञानिकांना पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा देतो. खूप खूप अभिनंदन करतो. आणि मला खात्री आहे, की आपले अंतराळाचे वैज्ञानिक आणखी नवीन कामगिरी करुन दाखवतील आणखी नवा शोध लावतील आणि भारताचे नाव अवकाशातील त्या क्षितीजांना पार करुन जगभरात आपला झेंडा फडकेल या अपेक्षेसह खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन.
S. Kane /B. G.
First and foremost I want to congratulate all @isro scientists and the entire team. I also congratulate the people of India: PM
— PMO India (@PMOIndia) April 28, 2016
In space science, our scientists have achieved many accomplishments. Through space science lives of people can be transformed: PM
— PMO India (@PMOIndia) April 28, 2016
India has launched 7 such navigation satellites which have been successful: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 28, 2016
With this successful launch, we will determine our own paths powered by our technology. This is a great gift to people from scientists: PM
— PMO India (@PMOIndia) April 28, 2016
Our efforts will not only help India but we can help fellow SAARC nations as well: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 28, 2016
The benefits from this new technology will benefit our people, our fishermen. The world will know it as Navic: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 28, 2016
This is example of @makeinindia, made in India and made for Indians. 125 crore Indians have got a new Navic: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 28, 2016