Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि सेंट व्हिसेंट, ग्रेनेडाईन्स यांच्यातल्या पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


 

भारत आणि सेंट व्हिसेंट तसेच ग्रेनेडाईन्स यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 11 सप्टेंबर 2019 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

लाभ-

यामुळे सेंट व्हिसेंट, ग्रॅनेडाईन्स आणि भारत यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी ढाचा उपलब्ध होईल आणि त्याचा परस्परांना लाभ होईल.

या सामंजस्य करारामुळे सेंट व्हिसेंट आणि ग्रॅनेडाईन्समध्ये आयुष प्रणालीचे महत्व वाढवण्यासाठी चालना मिळेल.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor