पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांचे कुटुंबिय आणि अमेरिकेच्या जनतेला नववर्षात उत्तम आरोग्य, भरभराट आणि सुयश लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.
विश्वास, परस्पर आदर यावर आधारलेले भारत-अमेरिका संबंध अधिकाधिक बळकट होत आहेत. मागच्या वर्षात दोन्ही देशांदरम्यानची धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यात लक्षणीय प्रगती पंतप्रधानांनी अधोरेखित केली आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमवेत परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करण्यासाठीचे कार्य जारी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नववर्षात भारतातल्या लोकांच्या प्रगती आणि भरभराटीसाठी सदिच्छा व्यक्त केली. गेल्या काही वर्षात उभय देशांच्या संबंधातल्या कामगिरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीच्या आपल्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane