Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ऐतिहासिक बोडो कराराचे पंतप्रधानांनी केले स्वागत या करारामुळे बोडो नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन येणार


आज झालेल्या ऐतिहासिक बोडो कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. हा करार बोडो जनतेच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणणारा ठरेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

‘या करारामुळे शांतता, सौहार्द आणि एकत्रित भावनेची नवी पहाट उजाडली आहे. भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. बोडो संघटनांसोबत आज झालेला करार त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल.

आज झालेला बोडो करार अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. या करारामुळे विविध हितसंबंधी गट एकत्र आले आहेत. आजवर जे गट सशस्त्र कारवायांमध्ये गुंतलेले होते ते आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावणार आहेत.

या करारामुळे बोडो जमातीच्या लोकांचे संरक्षण होईल तसेच बोडो संस्कृती लोकप्रिय करण्यातही हातभार लागेल. सरकारच्या विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी या करारामुळे बोडोंना मिळेल. बोडो जमातीच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत’, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

**********

B.Gokhale/R.Aghor/P.Kor