पीएम्इंडिया
भारत आणि ब्रुनेई दारुसलेम यांच्यात युवा आणि क्रीडा क्षेत्रात झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला आज माहिती देण्यात आली. 02.02.2016 या दिवशी बंदर सेरी बेगवान ब्रुनेई येथे उभय देशात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. युवा आणि क्रीडा क्षेत्रात कार्यक्रमाचे आदान-प्रदान, अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणविषयक कार्यक्रमांचे आदान-प्रदान क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासंदर्भात प्रोत्साहन, क्रीडा साहित्य, क्रीडा प्रशिक्षण, शारिरीक शिक्षण इत्यादी बाबींचा या सहकार्यात समावेश आहे.
N.Chitale/B.Gokhale