पीएम्इंडिया
भारतीय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय आणि फ्रेंच नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची मानके आणि शिफारस करण्यात आलेल्या कार्यप्रणालीला प्रोत्साहन आणि अंमलबजावणी करण्यासाठीच्या तंत्रविषयक सहकार्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी हा करार करण्यात आला.
दोन्ही देशांच्या सरकारांनी संमती दिल्यानंतर या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या कराराचा कालावधी चार वर्षांचा आहे. भारतीय हवाई वाहतूक महासंचालनायाच्या अधिकाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या दृष्टीने हा तंत्रविषयक सहकार्य कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. अभियंते, तंत्रज्ञ, व्यवस्थापक यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्यविषयक सामंजस्य करार लाभदायक ठरणार आहे.
N.Chitale/B.Gokhale