Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंटरनॅशनल कॉन्टिनेंटल साइंटिफिक ड्रिलिंग प्रोग्रामच्या भारताच्या सदस्यत्वाला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भूविज्ञानासाठी हेल्मल्त्झ सेंटर पॉट्सडॅम जीएफझेड या जर्मन संशोधन केंद्राबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करुन इंटरनॅशनल कॉन्टिनेंटल साइंटिफिक ड्रिलिंग प्रोग्रामच्या (आयसीडीपी) भारतीय सदस्यत्वाला मंजुरी दिली. हे जर्मनीच्या ब्रँडेनबुर्गचे सरकारी अनुदानित सार्वजनिक विधि प्रतिष्ठान आहे.

आयसीडीपीबरोबर पाच वर्षांसाठीच्या सदस्यत्वासाठी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यावर भारताला कोयना परिसरात डीप ड्रिलिंग आणि संलग्न शोधासाठी ड्रिलिंगशी संबंधित आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध तज्ञांची मदत घेता येईल.

सदस्यत्व, कराराचा एक भाग म्हणून भारताला दोन आयसीडीपी पॅनेलवर एक जागा मिळेल. कार्यकारी समिती आणि असेंब्ली ऑफ गव्हर्नर्स. तसेच भूविज्ञान मंत्रालयाने हाती घेतलेल्या कोयना वैज्ञानिक डीप ड्रिलिंगसाठी आयसीडीपी तांत्रिक सहाय्य, मनुष्यबळ प्रशिक्षण, नमुने आणि माहितीचे व्यवस्थापन आणि कार्यशाळा यासाठी मदत करेल.

आयसीडीपीचा सदस्य या नात्याने, भारतातील वैज्ञानिक / इंजिनिअर्सना प्रस्ताव पाठवण्याचे, आयसीडीपी पुरस्कृत कार्यशाळा ड्रिलिंग प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचे आणि आयसीडीपी प्रकल्पांतून मिळालेली माहिती प्राप्त करण्याचे अधिकार मिळतील. यामुळे भूकंप प्रक्रियेबाबत अधिक माहिती समोर येईल.

S. Kane / B. Gokhale