पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. २०१९-२० सालापर्यंत ५० लाख प्रशिक्षणार्थी ना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असून या योजनेसाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
कौशल्य प्रशिक्षण आणि उद्यमशीलता विभागाअंतर्गत प्रशिक्षण महासंचालकाद्वारे या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.याअंतर्गत प्रशिक्षणार्थी नेमण्यासाठी मालकांना प्रोत्साहित केले जाईल. एकूण विद्यावेतनाच्या २५ % खर्च केंद्र सरकार करेल.
या व्यतिरिक्त मूलभूत प्रशिक्षण देखील दिले जाईल. मूलभूत प्रशिक्षणाचा ५० % खर्च केंद्र सरकार करेल.
S.Kane/Bhavna Gokhale