पीएम्इंडिया
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत 97 किलो वजनी गटात, अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर कांस्यपदक जिंकल्याबद्दल दीपक पुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सहा दशकांनंतर भारत आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.
मोदी म्हणाले की, दीपक पुनियाच्या कामगिरीमुळे भारताच्या कुस्तीच्या प्रवासात एका नवीन अध्यायाची भर पडली आहे. पंतप्रधानांनी दीपक पुनियाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
“सहा दशकांनंतर, आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताने पुन्हा एकदा पदक जिंकले आहे!
अतिशय चुरशीच्या लढतीनंतर दीपक पुनियाने कांस्यपदक पटकावले असून, भारताच्या कुस्ती प्रवासात एक नवीन अध्याय जोडला आहे. त्याचे अभिनंदन. त्याला भविष्यातही असेच यश मिळत राहो: पीएम @narendramodi”
Six decades later, India is back on the podium in the Men’s 97kg Freestyle Wrestling event at the Asian Games!
Deepak Punia has brought home the Bronze after a fiercely contested bout, adding a new chapter to India’s wrestling journey. Congrats to him. May he keep attaining more success in the times to come: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 3, 2026
***
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]