Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

टपाल विभाग आणि पोर्तुगाल टपाल विभाग यांचे संयुक्तपणे टपाल तिकीट प्रकाशित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला टपाल विभाग आणि पोर्तुगाल टपाल विभाग यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या टपाल तिकिटाची माहिती देण्यात आली.

विविध माध्यमांद्वारे सक्रिय आणि सातत्यपूर्ण संवादातून भारत आणि पोर्तुगाल यांचे उत्तम द्विपक्षीय संबंध आहेत. त्यामुळे अनेक विषयांवर उभय देशांना मते व्यक्त करता येतात. दोन्ही देशांसाठी हे सहकार्य फलदायी आणि लाभदायी ठरले आहे. आणि आगामी काळात उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होत जातील. या संयुक्त उपक्रमामुळे दोन्ही देशांच्या टपाल विभागांना टपाल तिकिटांचा संग्रह निर्माण करण्यात मदत होईल.

S.Kane/B.Gokhale