पीएम्इंडिया
राजेंद्र केंद्रीय कृषी विद्यापीठ विधेयक 2015 मधील सुधारणेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पूर्वकार्योत्तर मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, राजेंद्र केंद्रीय कृषी विद्यापीठाचे नामकरण डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ असे केले जाणार आहे.
कृषी आणि तत्सम विज्ञानासंबंधी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, हे पुसा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाचे मुख्य ध्येय आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून तांत्रिक मनुष्यबळाची चणचण कमी करणे शक्य होणार आहे.
M.Pange/B. Gokhale