Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माहिती, दूरसंचार तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि टयूनिशिया यांच्यात सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला, माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि टयूनिशियाने 2 जून 2016 रोजी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराबाबतची माहिती देण्यात आली.

माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये उभय देशांच्या खासगी संस्था, सरकार आणि अन्य सरकारी आणि खासगी संघटनांदरम्यान सक्रिय सहकार्य आणि देवाणघेवाण वृध्दिंगत करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

S.Kane/B.Gokhale