पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2015 मध्ये सुधारणा करायला मंजुरी दिली आहे.
हा कायदा बनल्यावर या विधेयकाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेच्या स्वरुपात हे विधेयक मजबूत करणे हा या सुधारणांचा उद्देश आहे.
तसेच बेनामी व्यवहार आणि अनुचित पध्दतींच्या माध्यमातून कायद्याचे पालन टाळण्याला आळा घालणे हा देखील या विधेयकाचा उद्देश आहे. हा कायदा सरकारला बेनामी संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देतो. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये समानता येईल. मात्र, जे लोक उत्पन्न घोषणा योजनेअंतर्गत, बेनामी संपत्ती जाहीर करतील, त्यांना या कायद्यातून सूट मिळेल.
S.Kane/B.Gokhale