Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वित्त विधेयक 2021 मधल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत, वित्त विधेयक 2021 ( वित्त कायदा 2021 म्हणून 28 मार्च 2021 ला लागू करण्यात आला ) मध्ये सरकारच्या सुधारणांना पूर्वलक्षी प्रभावाने  मंजुरी देण्यात आली.

प्रस्ताव सुस्पष्ट आणि सुसुत्र करण्यासाठी तसेच वित्त विधेयकात प्रस्तावित सुधारणांबाबत संबंधितांच्या चिंतांची दखल घेण्यासाठी या सुधारण आवश्यक होत्या.

 

उद्देश

वित्त विधेयक 2021 मध्ये सरकारच्या सुधारणांमुळे, प्रस्तावित विधेयकातल्या सुधारणांबाबत संबंधितांच्या चिंतांची दखल घेत सर्व करदात्यांना न्याय्य आणि समावेशकता प्राप्त होईल.

वित्त विधेयक 2021 मध्ये सरकारच्या सुधारणा कर प्रस्ताव असून त्यामुळे सरकारसाठी वेळेवर महसूल निर्मिती होईल आणि करदात्यांच्या तक्रारींची दखल घेत सध्याच्या तरतुदी सुटसुटीत करण्यात येतील.

 

* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]