Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले; श्यामजी कृष्ण वर्मा यांचे जीवन धैर्याची प्रेरणा देते, असे त्यांनी म्हटले आहे.


थोर स्वातंत्र्य सैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जीवनातून आपल्याला धैर्य आणि जिद्दीची एक विलक्षण प्रेरणा मिळते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांचे जीवन देशवासीयांमध्ये देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडण्याची भावना देखील निर्माण करते, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

याच अनुषंगाने पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला आहे –
विचित्रचरितोल्लेखचमत्कारितचेतनम्।
प्राप्यते किं यशः शुभ्रमनङ्गीकृत्य साहसम्॥

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
थोर स्वातंत्र्य सैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जीवनातून आपल्याला साहस आणि धैर्याची अद्भूत प्रेरणा मिळते. त्यांचे जीवन देशवासीयांमध्ये देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडण्याची भावना देखील निर्माण करते.

विचित्रचरितोल्लेखचमत्कारितचेतनम्।
प्राप्यते किं यशः शुभ्रमनङ्गीकृत्य साहसम्॥”

***
NehaKulkarni / TusharPawar / DineshYadav
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai