Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र यांनी सामायिक केले शिक्षणाची परिवर्तनाची शक्ती सांगणारे संस्कृत सुभाषित


नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025

पंतप्रधान म्हणाले, की शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन नसून जीवन अधिक समृद्ध आणि सक्षम बनवणारे एक प्रभावी माध्यम आहे. त्यांच्या मते, शिक्षण ही एक अमूल्य संपत्ती आहे, ज्याच्या बळावर देशातील तरुण विविध क्षेत्रांत नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत आणि राष्ट्राचे नाव उंचावत आहेत.

याच संदर्भात, पंतप्रधानांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषितही सामायिक केले.

“श्रियः प्रदुग्धे विपदो रुणद्धि
यशांसि सूते मलिनं प्रमार्ष्टि।
संस्कारशौचेन परं पुनीते
शुद्धा हि बुद्धिः किल कामधेनुः॥”

या सुभाषिताचा अर्थ असा आहे, की सुशिक्षित, संस्कारित आणि शुद्ध बुद्धी माणसाच्या आयुष्यातील अडचणी दूर करून यश, सन्मान, शांतता आणि प्रगती घडवून आणते. खरे तर, प्रबुद्ध मन हे कामधेनूप्रमाणे मानले जाते, जे सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर याबाबत लिहिले,
“शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर जीवन अधिक श्रेष्ठ आणि समृद्ध बनवणारे एक प्रभावी माध्यम आहे. ही अशी अनमोल संपत्ती आहे, ज्याच्या बळावर आज आपल्या देशातील तरुणशक्ती प्रत्येक क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत देशाचे नाव उज्ज्वल करत आहे.”

श्रियः प्रदुग्धे विपदो रुणद्धि
यशांसि सूते मलिनं प्रमार्ष्टि।
संस्कारशौचेन परं पुनीते
शुद्धा हि बुद्धिः किल कामधेनुः॥”

नितीन फुल्लुके/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com