Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंतराळाचा शांततेसाठी उपयोग याबाबत भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या सहकार्य करारा विषयी केंद्रीय मंत्रिमंडळाला माहित


बाह्य अंतराळाचा शांततेसाठी उपयोग आणि शोध याबाबत भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या सहकार्य कराराच्या रुपरेखेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत माहिती देण्यात आली. 3 सप्टेंबर 2016 ला या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान, उपग्रह संपर्क आणि उपग्रह आधारित दिशादर्शन, अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग, दूरसंवेदन यासारख्या संभाव्य सहकार्याच्या क्षेत्राचा पाठपुरावा या करारामुळे होणार आहे. या कराराद्वारे व्हिएतनामशी होणारे सहकार्य, मानवजातीच्या कल्याणासाठी, अंतराळ तंत्रज्ञानाच्या उपयोगात संयुक्त कृती विकासाकडे नेणार आहे. उपग्रह दळणवळण, अंतराळ विज्ञान यासारख्या क्षेत्रात नव्या संशोधन कार्याला या करारामुळे गती मिळणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar